घरक्राइमभयंकर! भिवंडीत मामानेच केला आठ वर्षीय भाचीवर अमानुष अत्याचार

भयंकर! भिवंडीत मामानेच केला आठ वर्षीय भाचीवर अमानुष अत्याचार

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने गणपती सणापासून मावशीकडे पाहुणी म्हणून येऊन राहिलेल्या आठ वर्षीय भाचीवर मामाने वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना जांभुळपाडा (चावे) येथे समोर आली आहे. या घटनेने मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जांभिवली येथे राहणारी आठ वर्षीय भाची शाळा बंद असल्याने मावशीकडे येऊन राहिली होती.

दरम्यान, २६ वर्षीय मामाची तिच्यावर वक्र दृष्टी पडली आणि त्याने तिला दमदाटी करून वेळोवेळी तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या अत्याचाराने त्रस्त झालेल्या भाचीने तिच्यावर होणाऱ्या अमानुष घटनेची माहिती मावशीला सांगितली असता तिला धक्काच बसला. या घटनेने व्यथीत होऊन तिने अल्पवयीन भाचीला घेऊन गणेशपुरी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला असता पोलिसांनी बलात्कार व पोक्सॉअंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री उशिराने अत्याचारी मामाला अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलिस ठाण्याचे इंचार्ज महेश सगडे यांनी शनिवारी अत्याचारी मामाला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

जगातील सर्वाधिक लांबीचा टनेल आता भारतात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -