घरठाणे'अनंत करमुसे मारहाणप्रकरणी अटकेतील 'त्या' पोलिसांचे निलंबन करा'!

‘अनंत करमुसे मारहाणप्रकरणी अटकेतील ‘त्या’ पोलिसांचे निलंबन करा’!

Subscribe

ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणातील मुख्य सुत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तिघा पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे भाजपाने केली आहे. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या आणि ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने आज, शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.

ठाण्यातील एका मंत्र्यांच्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना ५ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनीच करमुसे यांना घरातून नेले होते. या प्रकरणात सुमारे ६ महिन्यांनंतर पोलीस शिपायांना अटक करण्यात आली. मात्र, अद्यापि या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाने आज पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

- Advertisement -

मारहाण प्रकरणात अटक केलेल्या तिघा पोलीस शिपायांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या. करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित पोलिसांना कोणी आदेश दिला होता?, करमुसे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाली असल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तिघा पोलीस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, इंजिनिअर अनंत करमुसे यांच्यावरील मारहाणप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाडांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

हेही वाचा –

TRP RACKET :रिपब्लिकच्या CFO सह दोन जाहिरात कंपन्यांना समन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -