Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या, मृतदेह भरला गोणीत

जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या, मृतदेह भरला गोणीत

अवघ्या काही तासातच पोलिसांनी केला गुन्हा उघड

Related Story

- Advertisement -

मुलगा सतत पैशाची मागणी करून घरात त्रास देत धमकावत होता. यामुळे जन्मदात्या आईने मोठया मुलाच्या व दूरच्या नातेवाईकाच्या मदतीने आपल्या दोन नंबरच्या मुलाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह कसारा घाटात टाकला. याच हात्येचा उलघडा कसारा पोलिसांनी अवघ्या ४ तासात लावला आहे. ठाणे येथील चिराग नगरमधील शिवाजी रामदास आगळे वय २५, सतीश रामदास आगळे,वय २४ हे दोन भाऊ आपली आई मायाबाई रामदास आगळे हिच्या सोबत राहत होते. दोन भावा पैकी शिवाजी हा एका डेअरी मध्ये मजुरी काम करीत होता. तर सतीश हा बेरोजगार होता. आई घरकामगार आहे.

आरोपी आईने दिलेल्या माहितीनुसार, बेरोजगार असलेला सतीश हा घरात दररोज दारू पिऊन शिव्या देत पैशाची मागणी करीत होता. पैसे नाही दिले तर तुम्हाला मारून टाकीन अशी दम दाटी करायचा असाच प्रकार त्याने ६ जानेवारीला केला. त्याच वेळी आई मायाबाईने कट रचत आपल्या मोठया मुलाच्या व नात्याने भाचा असलेल्या अमृत जंगा बिरारे वय २४ यांची मदत घेत दि. ७/१/२१ रोजी पहाटेच्या सुमारास सतिषची धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्याचे हाथ पाय बांधून त्याला दोन ते तीन प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळले. त्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरला. बोलेरो गाडी एमएच ३९ जे १७०६ या गाडीत टाकून सकाळी ६ च्या दरम्यान कसारा घाटातील दरीत मृतदेह फेकून दिला.

आईनेच घेतली पोलिसांत धाव

- Advertisement -

दरम्यान दोन दिवसानंतर मयतची आई मायाबाई व शिवाजी आगळे यांनी एक बनाव रचला व दिनाक ९/०१/२१ रोजी सकाळी मयत सतिषचे कपडे घेऊन पुन्हा कसारा घाटात आले. तिथे टेहाळणी करून ते कपडे घाटातील त्याच जागी एका कठड्यावर ठेवले. तेथून काही अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीत गेले. चौकीत कार्यरत असलेले महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांना भेटून असे सांगितले की, मला फोन आलेला. आमच्या मुलाचा घातपात झालाय त्याचे कपडे घाटात आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्ग पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ कसारा पोलीस ठाण्यात कळवले व तपास सुरु केला. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी. पी. भोये यांनी वरिष्ठांना माहिती देत, पोलीस उपनिरीक्षक भोस व कर्मचाऱ्यांना घेऊन घाटातील ठिकाणी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीहीं घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलीस अधिकाऱ्यांना घाटातील दरीत १५० फुटावर एक संशयस्पद पोते दिसले. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने दरीतील पोते वर काढले. त्या पोत्यात सतीश रामदास आगळे याचा मृतदेह आढळून आला. काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मयतची आई मायाबाई व भाऊ शिवाजी यांना सोबत घेत त्यांना कसारा पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी कसारा पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मायाबाई आगळे व शिवाजी आगळे यांची स्वतंत्र उलट तपासणी केली. अनेक सत्य समोर आले त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदणासाठी जे जे हॉस्पिटल ला रवाना केला.

४ तासात तपास निष्पन्न

- Advertisement -

या प्रकरणी कोकण परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ठवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश मनोरे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डि.पी.भोये, पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस,पोलीस उपनिरीक्षक धनवटे, अहिरराव, पोलीस कर्मचारी बावधणे, बिन्नर, राठोड, चौधरी, गायकवाड, परदेशीं, हाबळे, सुनील जाधव, चाळके, परदेशीं, बोडखे, साहिल, कडव, राणे तसेच महिला पोलीस रुपाली पाटील,संजना पाटील, यांच्या पथकाने योग्य दिशेने तपास करीत अवघ्या ४ तासात खुनाचा गुन्हा उघड केला. फिर्यादी असलेल्या आई मायाबाई व भाऊ शिवाजीची चौकशी करून त्यांच्या सह त्यांचा नातेवाईक अमृत बिरारे याला अटक केली. त्यांना शहापूर न्यायाल्याने १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासकामात आरोपीच्या घरातून धारदार शस्त्र सह अन्य साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणी पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये करीत आहेत.

- Advertisement -