घरठाणेएअर फोर्सची एनओसी मिळवणारे ते 'भाग्यवंत बिल्डर्स' कोण?; भाजपा नगरसेवकाचा सवाल

एअर फोर्सची एनओसी मिळवणारे ते ‘भाग्यवंत बिल्डर्स’ कोण?; भाजपा नगरसेवकाचा सवाल

Subscribe

एअर फोर्सच्या कोलशेत येथील स्टेशनलगत बहुमजली इमारती उभारण्यासाठी एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहजपणे एनओसी मिळविणाऱ्या भाग्यवंत बिल्डर्सची नावे महापालिकेने जाहीर करावीत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर एनओसी मिळवण्यासाठी राबविलेल्या कायदेशीर प्रक्रियेनुसार, कोलशेत येथील भूमिपूत्रांना नवी घरे व घरदुरुस्ती करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी विनंतीही मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

एअर फोर्सच्या कोलशेत येथील तळापासून १०० मीटर अंतरापर्यंतच्या बांधकामांना महापालिकेकडून बंदी घालण्याचा आदेश नुकताच जारी करण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच या भागात काही बिल्डरांकडून बहुमजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. कोलशेत येथील स्टेशनची १९६८ मध्ये निर्मिती झाल्यानंतर, तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. या काळात भूमिपूत्रांची घरे मोडकळीस आली आहेत. मात्र, त्यांना नवी घरे बांधण्यास वा घरदुरुस्ती करण्यासाठी परवानगी नाकारली जाते. या संदर्भात नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सातत्याने आवाज उठविला होता. आता महापालिकेच्या नव्या आदेशानंतर कोलशेतमधील भूमिपूत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मोडक्या घरात आम्ही जन्मभर राहायचे का, असा त्यांचा सवाल आहे.

- Advertisement -

एअर फोर्सच्या एनओसीनंतर काही बड्या बिल्डरांना बहुमजली इमारतींसाठी परवानगी मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या मान्यतेने उभारलेल्या इमारतीत रहिवाशी राहायला आले. पडक्या घरात भूमिपूत्र राहत असताना, प्रशस्त फ्लॅटमध्ये बाहेरील नागरिक वास्तव्याला आले. या परिस्थितीत भूमिपूत्रांनाही न्याय मिळण्याची गरज आहे. त्यानुसार एअर फोर्सची एनओसी कशी मिळाली, त्यासाठी संबंधित बिल्डरांनी कोणती कायदेशीर प्रक्रिया राबविली, याची बिल्डरांच्या नावांसह माहिती जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्याधर्तीवर भूमिपूत्रांच्या घरांनाही परवानगी मिळविता येईल, याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा –

‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधींचा कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -