घरठाणेCCTV : फक्त पोलीस होते म्हणून महिलेचा जीव वाचला! ठाणे स्थानकावरचा प्रकार!

CCTV : फक्त पोलीस होते म्हणून महिलेचा जीव वाचला! ठाणे स्थानकावरचा प्रकार!

Subscribe

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उत्तर प्रदेशातून आलेल्या महिलेला रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. महानगरी एक्स्प्रेस या गाडीतून उतरत असताना गाडी सुरु झाली आणि गाडीतुन खाली उतरत असताना या महिलेचा पाय ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये गेला. परंतु रेल्वे पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने वेळीच या महिलेला बाहेर खेचल्यामुळे तिचे प्राण वाचले. हा प्रकार शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ५ वर घडला. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं घडलं काय?

धनपट्टी राजू भारद्वाज असे या महिलेचे नाव आहे. ही महिला शनिवारी पती आणि लहान मुलीसह महानगरी एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशातून आली होती. महानगरी एक्सप्रेस ही गाडी सकाळी १० वाजून ४२ मिनिटांनी ठाणे स्थानक फलाट क्रमांक ५ वर आली असता या महिलेचा पती राजू हा मुलगी आणि सामान घेऊन ट्रेन मधून उतरला आणि धनपट्टी ही गाडीतून उतरत असताना गाडी सुरु झाली. गाडी सुरू झाल्यामुळे ही महिला घाबरली आणि तिने उलट्या बाजूने उतरत असताना तिचा पाय ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये अडकला. त्याच वेळी फलाटावार गस्तीवर असणारे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन पाटील आणि जमादार सत्तार शेख हे धावत आले त्यांनी लागलीच या महिलेला बाहेर काढून तिचे प्राण वाचवले.

- Advertisement -

पोलिसांनी या महिलेला तिच्या पतीच्या ताब्यात दिले. पोलिसांमुळे आज माझी पत्नी सुखरूप आहे. देवाच्या रूपाने ते माझ्या पत्नीच्या मदतीला धावून आले असे बोलून धनपट्टी या महिलेच्या पती राजू भारद्वाज याने पोलिसांचे मनापासून आभार मानले. हा सर्व प्रसंग फलाटावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून हे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे सपोनि. नितीन पाटील आणि जमादार सत्तार शेख याचे कौतुक केले आहे.

इथे पाहा संपूर्ण घटनेचे CCTV फूटेज!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -