Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग १० वर्षीय एरिनची कमाल ! वजनापेक्षा उचलतेयं भारी वजन

१० वर्षीय एरिनची कमाल ! वजनापेक्षा उचलतेयं भारी वजन

अवघ्या सातव्या वर्षापासून करते व्यायामाचा सराव

Related Story

- Advertisement -

तरुण, तरुणींमधील व्यायामाचे वेड आपण ऐकून आहोत. सेलिब्रिटींचे किंवा फिटनेस आयकॉनचे अनुकरण करत स्वत;ला फिट ठेवण्यासाठी तरुण काय काय करतील याचा नेम नसतो. स्वत:ला कमीवेळात अधिक फिट ठेवण्यासाठी तरुणमंडळी औषधे, गोळ्या, इंजेक्शनचा वापर करतात. कमी वेळात मिळणारी बॉडीचे काय साईट इफेक्ट होतात हे आपण जाणूनच आहोत. अशाच एका १० वर्षाची चुमरडी आहे एरिन एस्जिना एटकिंसन जिला व्यायामाचे प्रचंड वेड आहे. तिचे व्यायामाचे वेड पाहून आपणही अचंबित व्हाल. एरिन एस्जिना एटकिंसन ही १० वर्षीय चिमुरडी आपल्या वजनापेक्षा अधिक वजन उचलून लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत साऱ्यांसाठीच वेटलिफ्टीर आयकॉन बनत आहे. एरिन शाळेत जाण्याआधी रोज सकाळी वेट लिफ्टींगचा सराव करते. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी एरिना वेटलिफ्टींगचे धडे गिरवत आहे. यासाठी तिचे वडील क्रेग तिला नेहमी सहकार्य करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aeryn-Ejjina….. & Dad! (@jovanbkt)

- Advertisement -

जिममध्ये जाऊन सिक्स पॅक बनवने म्हणजे फिट राहणे अशी व्यायामाची व्याख्या झाली आहे. मग यासाठी अनेक तरुण तरुणी तासंतास जिममध्ये जातात तरी त्यांचा म्हणावा तसा परिणाम होत नाही. परंतु या १० वर्षीय चिमुकली वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून व्यायामाचा सराव करत स्वत:ला फिट ठेवत आहे. एरिना घरच्या घरीच व्यायाम करत जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळणाऱ्या तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण करत आहे. व्यायामासाठी लागणाऱ्या सर्व इक्विप्मेंट्स तिच्या वडिलांनी तिला घरच्या घरी आणून दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aeryn-Ejjina….. & Dad! (@jovanbkt)

- Advertisement -

याबद्दल बोलताना तिचे वडील क्रेग सांगतात, लहानपणापासूनच तिला व्यायामाची आवड आहे. मोठे होऊन ती ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स, क्रॉसफिट गेम्समध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहते. नाताळ सणादिवशीही तिने भेटवस्तू म्हणून वेटलिफ्टिंग इक्विप्मेंट्स मागितले होते. आणि अशा भेटवस्तू सहसा लहान मुले मागित नाहीत. एरिन रोज आपल्या व्यायामावर पूर्णपणे लक्ष देत डंबेल्स आणि केटल बॉल्ससोबत सराव करत असते. वेटलिफ्टिंग प्रति तिची आवड पाहता तिला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार, मेडल्स मिळाले आहेत. ऑलिंपिकमध्ये सहभागी होत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत स्वत;च्या स्वप्नांना एरिन सत्यात उतरवू पाहत आहे.

- Advertisement -