धक्कादायक! कासवाच्या पोटात आढळले १०४ प्लास्टिकचे तुकडे

हाताच्या पंजा एवढा असलेल्या या कासवाच्या पोटात १०४ प्लास्टिक तुकडे आढळले आहेत. महासागर प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले आहे.

Tallahassee
104 pieces of plastic found in dead baby turtle's belly. Heartbreaking pic upsets Internet
धक्कादायक! कासवाच्या पोटात आढळले १०४ प्लास्टिकचे तुकडे

प्लास्टिक वापरण्याबाबत सध्या गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये छोट्या आकाराचा कासव मृत अवस्थेत सापडला. या मृत अवस्थेत सापडलेल्या कासवाच्या पोटात तब्बल १०४ प्लास्टिकचे तुकडे सापडले आहेत, अशी धक्कादायक माहिती सीएनएनने दिली आहे. गुंबो लिंबो नेचर सेंटरने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून या कासवाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या या कासवाचा फोटो सोशल मीडियावर फारच व्हायरल होतं आहे.

हे कासव मृत होण्यापूर्वी कमकुवत झाले होते, अशी माहिती सीएनएनला दिली आहे. ही दुःखद अशी घटना आहे. आपल्या हाताच्या पंजा एवढा या कासवाच्या आतड्यात प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे सापडले आहेत. महासागराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असं गुंबो लिंबो नेचर सेंटरने कासवाचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

तसंच या संस्थेने असं देखील लिहिलं आहे की, ‘या कासवला मदतीची फारच आवश्यकता होती. हा कासव त्याचे आयुष्य जगू शकला नाही हे दुर्भाग्य आहे. असे १२१ कासव मृत अवस्थेत सापडले आहेत’, असं डब्ल्यूपीटीव्हीशी बोलताना या संस्थेने सांगितलं आहे.

ग्रीनपीसच्या अहवालानुसार, ‘प्रत्येक मिनिटाला समुद्रात ट्रकभर एवढं प्लास्टिक कचरा पडतो. हे प्लास्टिक जेव्हा तुटत जात तेव्हा त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. हे तुकडे समुद्रातील जीवाना खूप भयानक आहेत’, असं सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा Video : चक्क माकड काढतंय पोलिसाच्या डोक्यातल्या उवा!