घरट्रेंडिंगखोल पाण्यात आयफोन पडला; १५ महिन्यांनी देखील चालला!

खोल पाण्यात आयफोन पडला; १५ महिन्यांनी देखील चालला!

Subscribe

१५ महीण्यांपूर्वा नदीत हरवलेला फोन सूस्थितीत सापडला

मोबाईल फोन आज प्रत्येकाजी गरज बनलाय. मोबाईल जीवापेक्षाही जास्त महत्त्वाचा झालाय. मोबाईल चुकून जर पाण्यात पडला तर लगेच बंद पडतो. पण जर तुम्हाला सांगितल की एक आयफोन नदीत पडला आणि १५ महिन्यानंतर तो सुस्थितीत मिळाला तर… तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण दक्षिण कॅरोलिनामधल्या एरिका बेनेट सोबत काही असचं घडलंय. १५ महिन्यानंतर तिचा फोन सहिसलामत परत मिळालाय. एरिका कुटुंबासोबत १९ जून, २०१८ दक्षिण कॅरोलिनामधील एडिस्टो नदीजवळ सहलीला गेली होती.

नक्की झालं काय? 

सहिलाला पाण्यात खेळत असताना एरिकाचा स्मार्टफोन नदीच्या पाण्यात पडला. १५ महिन्यांनतर मायकल बेनेट नावाचा तरुण याच नदीत स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी गेला होता. यावेळी नदीच्या तळाशी त्याला एरिकाचा फोन सापडला. १५ महिन्यांनंतर फोनवर शेवाळ जमलं होतं. फोनची अवस्था फारच बिकट होती.

- Advertisement -

मायकलने तो फोन घरी आणला आणि सहजच चार्जिंगला लावला. तुम्हाला आश्चर्य वाटेल चार्जिंग केल्यानंतर हा फोन सुरु झाला. याचं कारण म्हणजे एरिकाने तिचा फोन एका वॅाटर प्रूफ केसमध्ये ठेवल्यामुळे तो सुरक्षित राहिला होता. तरिही इतक्या खोल पाण्यात १५ महिने पडून देखील फोन सुस्थितीत होता.

- Advertisement -

फोन चालू झाल्यानंतर मायकलने सिम कार्डद्वारे फोनच्या मालकाचा शोध घेतला. त्यानंतरच त्याचा एरिकाशी संपर्क झाला. एरिकाला जेव्हा तिचा फोन परत मिळाला तेव्हा तिला देखील धक्काच बसला. त्यामुळे सहलीला किंवा पाणी असलेल्या ठिकाणी जाताना तुमचाही फोन वॉटरप्रूफ केसमध्ये ठेवायला विसरू नका. एरिकासारखा तुमचाही फोन कदाचित सुरक्षित राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -