घरट्रेंडिंग५ वर्षांचा चिमुरडा एसयूव्ही चालवत गेला लॅम्बोर्गिनी खरेदी करायला

५ वर्षांचा चिमुरडा एसयूव्ही चालवत गेला लॅम्बोर्गिनी खरेदी करायला

Subscribe

घरातल्या गाडीची चावी घेऊन कॅलिफोर्नियाला लॅम्बोर्गिनी विकत घेण्यासाठी तो जात होता. खिशात फक्त त्याचे ३ डॉलर्स होते.

एक ५ वर्षाचा मुलगा लॅम्बोर्गिनी खरेदी करायला घरातील एसयूव्ही घेऊन एकटाच घराबाहेर पडला. लॅम्बोर्गिनी विकत घेण्यासाठी तो शहरात जात होता. पण जाता जाता वाटेत त्याला पोलिसांनी अडवलं. अमेरिकेतील युटामधली ही घटना आहे. ५ वर्षांचा मुलगा महामार्गावर कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी एसयूव्ही चालवत होता. पण वाटेतच एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला अडवलं.

एक व्यक्ती महामार्गावर गाडी हळू चालवत असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने पाहिलं. पोलिसांना वाटलं की आजारी किंवा दुर्बल व्यक्ती कार चालवत आहे. पण जेव्हा त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला तेव्हा सत्य काय आहे ते कळालं. मुलाची ओळख जाहीर केलेली नाही. पण तो एसयुव्ही चालवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जेव्हा पोलिस त्याच्याकडे आले तेव्हा तो दोन्ही पायांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर पोलिसांनी कार बाजूला लावण्यात मदत केली.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाने अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला; ३० ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज काढावं लागणार


मुलाचे पालक ऑफिसमध्ये गेले होते. तो भावंडांसह घरी होता. दरम्यान, तो अचानक चावी घेऊन निघून गेला. वळणावर त्याला कार वळवण्यात अडचण येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुलाने पोलिसांना सांगितलं की तो युटाहून कॅलिफोर्निया येथे लॅम्बोर्गिनी खरेदी करण्यासाठी जात आहे. तथापि, त्याच्या खिशात फक्त ३ डॉलर्स आहेत हे त्याला माहित नव्हतं. पोलिसांनी सांगितलं की यापूर्वी त्याच्या आईने लक्झरी कार खरेदी करण्यास नकार दिला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -