Video: एकाच बाईकवर सहा जणांसोबत दोन कुत्रेही करतात प्रवास!

Mumbai
6 people and 2 dog -riding on a single bike viral video on social media

एका बाईकवर दोन लोक बसू शकतात. हे सगळ्यांच माहित आहे. जर बाईकवर दोनपेक्षा अधिक लोक बसले तर जीव धोक्यात आणण्याची शक्यता असते. मात्र, एका व्यक्तीने चक्क ६ जणांना आणि दोन कुत्र्यांना बाईक बसवून प्रवास केला आहे. हा प्रवास ते महामार्गावरुन करत आहेत. इतकंच नाहीतर या बाईकला पिशव्या देखील टांगण्यात आल्या आहेत. आता आपण हा विचार करत असाल की, एवढे जण एका बाईकवर कसे काय बसेल असतील? पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री पटेल.

या बाईकच्या इथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. २९ ऑगस्टला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओवर खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत २२ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूर्झरने असं लिहिलं आहे की, ‘हा जुगाड फक्त भारतातचं होऊ शकतो.’

टि्वटवरचा हा व्हिडिओ पाहून खूप लोक हैराण झाले आहेत. काही लोक या व्हिडिओ विरोधात बोले तर काही लोक या केलेल्या कृत्याला खतरनाक बोले आहेत.

या अगोदर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एका रिक्षा चालकाने चक्क रिक्षामध्ये २० लोकांना बसवले होते. हा व्हिडिओ तेलंगणातील करीमनगरमधला होता.