युट्यूबमुळे रेयान झाला मालामाल!

फोर्ब्स मासिकाने नुकतीच यंदाच्या वर्षातील युट्यूबद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली असून यानुसार अमेरिकेतील रेयान हा अवघ्या सात वर्षांचा मुलगा पहिल्या स्थानावर आहे.

Mumbai
ryan
युट्यूबवर अव्वल रेयान (सौजन्य-फोर्ब्स)

फोर्ब्स मासिकाने नुकतीच यंदाच्या वर्षातील युट्यूबद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली आहे. २०१७ – १८ या कालावधीत सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अमेरिकेतील रेयान हा अवघ्या सात वर्षांचा मुलगा पहिल्या स्थानावर आहे. त्याने चक्क २२ दशलक्ष डॉलर म्हणजेच १५५ कोटींची कमाई युट्यूबमुळे केल्याचे फोर्ब्स मासिमाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. युट्यूबवर Ryan ToysReview या नावाने त्याचं स्वतःचं एक चॅनल आहे. यावर विविध प्रकारच्या खेळण्यांची माहिती रेयान देतो. रेयानच्या युट्यूब चॅनलला एक कोटींहून अधिक जणांनी सबस्क्राइब केलं आहे.

खेळण्यांच्या दुकानात सुचली कल्पना 

रेयानच्या आईने गेल्या वर्षी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीनुसार, रेयान तीन वर्षांचा होता तेव्हाच युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार डोक्यात आला होता. रेयान लहानपणा पासूनच खेळण्याचे रिव्ह्यू देणारे टीव्ही चॅनल पाहायचा. एक दिवस आम्ही खेळण्याच्या दुकानात गेलो, तिथून लीगो ट्रेन खरेदी केली आणि तेथूनच युट्यूब चॅनलची सुरूवात झाली. त्यावेळी तो केवळ चार वर्षांचा होता.

वर्षभरात दुप्पट कमाई 

रेयानचं युट्यूब चॅनेल हे मार्च २०१५ मध्ये सुरू झालं. त्यानंतर जानेवारी २०१६ पर्यंत म्हणजे केवळ १० महिन्यांमध्येच त्याच्या चॅनलचे १० लाखांहून जास्त सबस्क्राइबर झाले होते. गेल्या वर्षी त्याची कमाई ११ मिलियन डॉलर होती. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये तो आठव्या क्रमांकावर होता. मात्र वर्षभरात त्याने दुप्पट कमाई करत थेट पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले. २०१५ साली जुलै महिन्यात रेयानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत रेयानने १०० कार असणाऱ्या एका खेळण्याचा रिव्ह्यू दिला होता. या व्हिडिओला तब्बल ९३५ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here