डोंबिवलीत घुमला ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आवाज

Dombivali
aarambh dhol tasha pathak play got title track
आरंभ ढोल ताशा पथकाचे GOT कनेक्शन

‘चातकाप्रमाणे वाट बघणं…’ ही म्हण जर तंतोतंत कुणाला बसत असेल तर ते गेम ऑफ थ्रोन्सचे चातक (म्हणजे चाहते ओ). GOT या टोपण नावाने गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका जगभरात फेमस आहे. गेल्या सात वर्षांपासून भाषेच्या सर्व आडकाठ्या बाजूला सारून या मालिकेने आपले कोट्यवधी प्रेषक तयार केले आहेत. यावर्षी १४ एप्रिलला या मालिकेचा शेवटचा म्हणजेच आठवा भाग प्रदर्शित होणार आहे. GOT चे चाहते इतके समर्पित आहेत की, त्यांना प्रत्येक गोष्टीत GOTचे पात्र, डायलॉग्ज आणि त्यांचे गाणे दिसते. आता हेच बघा ना.. गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि GOT यांचा काही संबंध आहे का? तरिही डोंबिवलीच्या शोभायात्रेत यावर्षी आकर्षण होते, ते GOT च्या टायटल ट्रॅकचे…

हे वाचा – बघाच, ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठव्या सीझनची झलक

GOT 8th Season

डोंबिवलीचे ‘आरंभ ढोल ताशा पथक’ हे पारंपरिक ढोल-ताशासाठी प्रसिद्ध आहे. मकरसंक्रात, गणेशोत्सव, नवरात्री आणि इतर सणांच्या वेळी हे पथक आपली कला सादर करत असतं. यावेळी शोभायात्रेच्या निमित्ताने आरंभ पथकाने GOTचा टायटल ट्रॅक वाजवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या मराठमोळ्या टायटल ट्रॅकला युट्यूबवर चांगलीच लोकप्रियता तर मिळतच आहे. मात्र ज्यांना GOT प्रकरण माहीत नव्हते, ते सुद्धा इंटरनेटवर याचा शोध घेत आहेत.

गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या भागाची उत्सुकता

लेखक जॉर्ज आर. आर. मार्टिन यांनी लिहिलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या कांदबरीवर ही मालिका आधारीत आहे. एचबीओ वाहिनीने या मालिकेची निर्मिती केली आहे. या फॅटंसी मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांचे सवांद चाहत्यांना तोंडपाठ झाले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी काही घराणे जो युद्धाचा खेळ सुरु करतात, त्याचा शेवट आठव्या भागात दाखवण्यात येणार आहे. हे करत असताना त्यांना एका अनामिक संकटाचा सामना करायचा आहे, ज्याची उत्कंठा आता ताणली गेली आहे.

हे देखील वाचा – ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं भारतीय कनेक्शन माहितेय?
Aarambh Dhol Tasha Pathak
आरंभ ढोल ताशा पथक (छायाचित्र – आरंभ टीम)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here