घरट्रेंडिंगरोज दारू ढोसाल तर लवकरच 'वरती' जाल!

रोज दारू ढोसाल तर लवकरच ‘वरती’ जाल!

Subscribe

दररोज १०० मिलिपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात होते घट

बदलत्या जीवनशैलीनुसार आणि धावपळीचे जीवन जगत असताना काहीजण व्यसनाधिनतेच्या आहारी जाताना दिसतात. रोजच्या व्यवहारात ताण-तणाव निर्माण झाल्याने कित्येकजण मद्यसेवन करत असतात. अतिमद्य सेवनाने व्यक्तिच्या आरोग्याविषयी समस्या वाढत जातात. त्यामुळे मद्यप्राशन करणे किंवा दारूचे व्यसन करणे शक्यतो टाळावे, असे तज्ज्ञांसह डॉक्टरांचे म्हणणे असते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका आरोग्यविषयक सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, दररोज प्रमाणापेक्षा जास्त मद्य सेवन केल्याने व्यक्तीची आर्युमर्यादा कमी होते.

एक ग्लास दारू; आयुष्यात घट

लान्सेट येथे प्रकाशित झालेल्या या आरोग्यविषयक अहवालानुसार, जी व्यक्ती दररोज एका ग्लासाहून अधिक मद्यपान करते, त्याचे आयुष्य घटते,असा निष्कर्ष समोर आला आहे. यावर संशोधन करताना या अहवालासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी वय वर्षे ३० ते १०० इतक्या वर्षाच्या ६० हजार व्यक्तींच्या मद्यपानाच्या सवयींचा अभ्यास केला. यामध्ये वेगवेगळ्या १९ देशांमधील नागरिकांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वैद्यकीय इतिहास, आजारपणं, राहणीमान, वय, लिंग अशा सगळ्यांच्या समावेश या अभ्यासात केला गेला.

- Advertisement -

दरम्यान या अभ्यासातून असा निष्कर्ष समोर आला आहे की, दररोज १०० मिलिपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात घट होते. अशा व्यक्ती इतर निर्व्यसनी किंवा कमी प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सहा महिने ते एक वर्ष कमी जगतात. या अहवालातून असे समोर आले आहे की, विविध देशांतील ४० हजारांहून जास्त मृत्यू हे अतिरिक्त मद्यपानाने झाले आहेत तर पोर्तुगाल, स्पेन, अमेरिका अशा देशांचे क्रमांक वरचे असून या देशातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -