घरट्रेंडिंगरहा अलर्ट! नाहीतर होईल बँक खाते रिकामे

रहा अलर्ट! नाहीतर होईल बँक खाते रिकामे

Subscribe

आयटी सुरक्षेसंबंधी सोफोज लॅब्सच्या अहवालानुसार गुगल प्ले स्टोअरवर अशा फेक अकाऊंट अ‍ॅपचा बोलबाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अ‍ॅपद्वारे अनेक बँकांमधील हजारो ग्राहकांचे पैसे आणि माहिती चोरीला गेली असल्याचंही म्हटलं आहे.

सध्या ऑनलाईन बँकिंग ही फारच सोयीची आणि सोपी गोष्ट झाली आहे. प्रत्येकाच्या फोनवर कोणते ना कोणतेतरी अ‍ॅप बँकेचे व्यवहार करण्यासाठी दिसून येतंच. पण जर तुम्ही मोबाईल बँकिंगच करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. वास्तविक गुगल प्लेवर असे अनेक फेक अकाऊंट आहेत ज्यामुळे तुमच्या बँकेचं खातं कधी रिकामं होईल हे तुम्हाला कळणारही नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नावाजलेल्या स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि सिटी बँक यासारख्या बँकांच्या अ‍ॅपसाठीही फेक अकाऊंट अ‍ॅप इथे दिसून येत आहेत. तर बँकांना या फेक अकाऊंटअ‍ॅप बाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे.

सोफोज लॅब्सकडून करण्यात आला दावा

आयटी सुरक्षेसंबंधी सोफोज लॅब्सच्या अहवालानुसार गुगल प्ले स्टोअरवर अशा फेक अकाऊंट अ‍ॅपचा बोलबाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अ‍ॅपद्वारे अनेक बँकांमधील हजारो ग्राहकांचे पैसे आणि माहिती चोरीला गेली असल्याचंही म्हटलं आहे. सोफोजने दिलेल्या अहवालानुसार नावाजलेल्या स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि सिटी बँक यासारख्या बँकांचे फेक अ‍ॅप्स आहेत. वास्तविक स्टेट बँकेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरीही सिटी बँकेच्या प्रवक्त्यांनी आपल्या बँकेच्या अ‍ॅपला अजूनपर्यंत असा कोणताही धोका झाला नसल्याचे सांगितले आहे. तर येस बँकेने यासंदर्भात सायबर गुन्हे विभागाला कळवले आहे.

- Advertisement -

हुबेहूब दिसते हे अ‍ॅप

या फेक अकाऊंट अ‍ॅपवर हुबेहूब त्याच बँकेचा लोगो लावलेला असतो. त्यामुळे लोकांना खर्‍या आणि खोट्या अ‍ॅपमधील फरक कळत नाही. अहवालानुसार, अशा अ‍ॅपमुळे आतापर्यंत हजारो ग्राहक तसेच क्रेडिट कार्ड उपभोक्त्यांची माहिती चोरीला गेली आहे. तसेच हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्यासाठी वेगवेगळी लाच अर्थात अधिक कॅशबॅक किंवा निःशुल्क मोबाईल डेटा असे देण्यात येते.

कसा बचाव करावा?

यासाठी काही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. खोटे अ‍ॅप असणे ही बाब आता नवी नाही. त्यामुळे कोणतेही बँकिंग अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी पहिल्यांदा व्यवस्थित पडताळणी करावी. तसेच मोबाईलमध्ये नेहमी अँन्टीवायरस सॉफ्टवेअरचाही वापर करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -