घरट्रेंडिंगआरोपानंतर आलोकनाथ धक्क्यात

आरोपानंतर आलोकनाथ धक्क्यात

Subscribe

आलोकनाथ यांच्यावर लागलेल्या आरोपानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले.

दिग्दर्शिका – निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर प्रेक्षक आता आलोकनाथ यांची बाजू ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. आरोपानंतर आलोकनाथ यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना दोन दिवसीय सक्तीच्या आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवस आलोकनाथ प्रसार माध्यमासमोर येणार नाहीत. कालपासून आलोकनाथ यांच्यावर #metoo मोहीमेअंतर्गत आरोप करण्यात येत आहे. आज आरोपाचे एक नवे प्रकरण समोर आले आहे. ‘हम साथ-साथ है’ चित्रपटाच्या सेटवरील एका महिलेने आलोकनाथ वर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता आलोकनाथ यांच्या अडचनीत वाढ झाली आहे. मात्र दोन दिवसानंतर आलोकनाथ पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे.

काय घडले आज?

‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलोकनाथ यांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आज एका महिलेने केला. उशीरा रात्री सुरु असलेल्या या चित्रीकरणादरम्यान ही महिला आलोकनाथ यांच्या चेंजिंगरुममध्ये कपडे देण्यासाठी गेली होती. त्यावेळी आलोकनाथ यांनी महिलेसमोर कपडे बदलले. तसेच या महिलेचा हाथ पकडून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप महिलेने केला आहे. ही महिला घडलेल्या घटनेची तक्रार दिग्दर्शक सुरज बडजात्यायांना करणार होती. मात्र आलोकनाथ आणि बडजात्या चांगले मित्र असल्यामुळे तिने तसे केले नाही.

- Advertisement -

आलोकनाथवरील इतर आरोप

अभिनेक्षी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #metoo मोहीमेची लाट आली आहे. या मोहीमेअंतर्गत दरदिवशी एका अभिनेत्याच नाव समोर येते आहे. क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल,गायक कैलाश खेर आणि मॉडेल जुल्फी सैयदनंतर बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणजेच आलोकनाथ यांच्यावर महिलांनी आरोप केले आहेत. पटकथा लेखिका आणि दिग्ददर्शक विनता नंदा ने आलोकनाथवर बलात्काराचा आरोप केला आहे. २० वर्षापूर्वीची ही घटना असून नंदाने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. विनता या ‘तारा’ मालिकेच्या निर्मात्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -