Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Amazon वरून मागवलेल्या पदार्थाला केक समजून पठ्ठ्यानं खाल्लं शेणं!

Amazon वरून मागवलेल्या पदार्थाला केक समजून पठ्ठ्यानं खाल्लं शेणं!

वाचा भन्नाट रिव्ह्यू

Related Story

- Advertisement -

डिजिटल युगात जगत असताना सर्वच जण सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करताना दिसताय. सध्याच्या धावपळीच्या शैलीत जीवत जगत असताना हवी असणारी गोष्ट एका क्लिकवर मिळत असल्याने आयुष्य अधिक सुखकर झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना ई-कॉमर्सचा वापरदेखील युजर्सकडून अधिक करण्यात आला. यामध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स वेबसाईचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या युजर्समध्येही वाढ झाली. दरम्यान, सोशल मीडियावर ऑनलाईन शॉपिंग केलेल्या युजर्सचा एक रिव्ह्यू चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

- Advertisement -

दरम्यान, हा व्हायरल होणारा रिव्ह्यू सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या रिव्ह्यूवरून असे दिसतेय की, या पठ्ठ्याने अॅमेझॉनवरून धार्मिक विधीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यांची ऑर्डर केली होती. मात्र घरी डिलिव्हरी बॉयने दिलेल्या शेणाच्या गोवऱ्या केक सारख्या दिसत असल्याने त्या पठ्ठ्यानं चक्क केक समजून हे सुकलेलं शेणंच खाल्लं. इतकंच नाही तर त्याने ते खाल्यानंतर यावर स्वतः रिव्ह्यू देखील लिहिला. मात्र असे सांगितले जातेय की, हे केक समजून शेण खाल्याने या व्यक्तीचे पोट बिघडले आणि त्याची तब्येतही खालावली.

असा दिला पठ्ठ्यानं रिव्ह्यू

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्यक्तीचा रिव्ह्यू वाचून असे दिसते की, त्याने ऑनलाईन मागवलेलं हे शेणं कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी वापरले नाही तर त्याने ते केक समजून खाल्ले. नुसतं ते खाल्लं नाही तर त्याबद्दल त्याने वेबसाईटवर त्याचा अभिप्राय देखील दिला. या रिव्ह्यूमध्ये त्यांने लिहिले की, ‘मी हा केक खाल्ला, त्याची चव खूपच वाईट आहे.’ त्याच्या रिव्ह्यूवर बर्‍याच लोकांनी कमेंटही दिली आहे. यासह या भन्नाट ग्राहकाचा रिव्ह्यू Amazon.in या वेबसाईटवरील top reviews from india मध्ये समाविष्ट झाल्याचेही दिसते.

- Advertisement -