Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Amzone बॉय करतोय चक्क घोड्यावरून वस्तूंची डिलिव्हरी

Amzone बॉय करतोय चक्क घोड्यावरून वस्तूंची डिलिव्हरी

घोड्यावरून हा डिलिव्हरी बॉय लोकांचे पार्सल त्यांच्या घरपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करत आहे.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आपल्याकडे ऑनलाईन मागवलेली वस्तू डिलिव्हरी बॉय गाडीने आपल्यापर्यंत पोहचवतो. पण आपल्याला डिलिव्हरी देणारा डिलिव्हरी बॉय जर घोड्यावरून आला तर ? आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे ना. सोशल मीडियावर सध्या काश्मीरमधील घोड्यावरून डिलिव्हरी देणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक जण आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत आहेत.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय घोड्यावरून पार्सल घेऊन ग्राहकांपर्यत पोहचवताना दिसत आहे. घोड्यावरून येणारा हा डिलिव्हरी बॉय Amazonचा डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगितले जात आहे. घोड्यावरून हा डिलिव्हरी बॉय लोकांचे पार्सल त्यांच्या घरपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करत आहे. काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. या बर्फामुळे संपूर्ण रस्ते बंद झाले आहे. त्यामुळे तिथे कोणचेही वाहन येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या डिलिव्हरी बॉयने शक्कल लावून डायरेक्ट घोड्यावरून लोकांची डिलिव्हरी द्यायला सुरूवात केली आहे.

एका युझरने ट्विटरवर या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ शेअर केला आहे. Amazon डिलिव्हरी इनोव्हेशन असे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत २० हजारांहून अधिक व्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुलगी झाली विरूष्काला पण तैमूरचीच होतेय चर्चा; मीम्स व्हायरल

 

- Advertisement -