घरट्रेंडिंगचांगल्या पतीच्या नादात बयेनं १० वेळा केलं लग्न, अजूनही शोधतेय 'मिस्टर राइट'

चांगल्या पतीच्या नादात बयेनं १० वेळा केलं लग्न, अजूनही शोधतेय ‘मिस्टर राइट’

Subscribe

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. तसंच लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलत असतं. त्यामुळे प्रत्येकजण परफेक्ट पार्टनर शोधूनच त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवतो. पण अमेरिकेतील एक महिलेनं मिस्टर राइटच्या शोधताना आतापर्यंत १० वेळा लग्न केल्याचं समोर आलं आहे. या महिने याबाबत कोणतीही परवा नाही केली की, किती लग्न झाले आणि पुढे कितीवेळा लग्न होईल. तिला फक्त आयुष्यात ‘मिस्टर राइट’ पाहिजे आहे.

मिस्टर राइट शोधत १० वेळा लग्न झालेल्या या महिलेचं नाव केसी (Cassey) असं आहे. ती अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणारी आहे. अलीकडेच तिने अमेरिकेच्या लोकप्रिय टिव्ही शो ‘Dr. Phil Show’ मध्ये याबाबत खुलासा केला. ती या शोमध्ये सक्सेसफुल बिझनेसव्हुमनच्या निमित्ताने सामील झाली होती. त्यावेळीस तिने आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी बातचित केली.

- Advertisement -

५६ वर्षीय केसी म्हणाली की, ‘आता तिने १०वं लग्न मोडलं. कारण ती या लग्नामुळे अस्वस्थ होती. ती त्यांच्या नात्यात खुश नव्हती. या दिवसांत कोणत्या कोणत्या कारणामुळे भांडणं होत होती. त्यामुळे ती आता नव्या पार्टनरच्या शोधात आहे.’

ती पुढे म्हणाली की, ‘तिचं एकचं लग्न ८ वर्ष टिकलं होतं. हे तिचं सर्वाधिक वर्ष टिकलेलं लग्न होतं. तिला वाटलं हे पुढं देखील नातं टिकून राहिल. पण असं काही झालं नाही. तसंच अजून एक लग्न ६ महिन्यांपर्यंत टिकलं होतं. १० लग्न तिने जरूर केली असतील. पण तिला आयुष्यात तितकेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. १० लग्न करणं हे तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही आहे. पण ती स्वतःला दुःखी पण ठेऊ शकत नाही. ती असं कोणतंच नात पुढे ठेवत नाही, ज्यामध्ये तिला असं वाटतं की, आता त्याचं नातं टिकवू ठेऊ शकणार नाही. ती थेट जोडीदाराला सांगते की, ‘मला घटस्फोट हवा आहे कारण मी आनंदी नाही.’ तिचं पहिलं लग्न ८ वर्ष टिकलं, दुसरं लग्न ७ वर्ष आणि तिसरं अडीच वर्ष. यादरम्यान तिला एक मुलगा देखील झाला. पण तिचं हे लग्न यामुळे तुटलं कारण तिच्या पतीने तिला असं म्हणायंच सोडून दिलं होत की, तिच्यावर प्रेम करत नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – तुम्हाला Whats app स्टेटस ठेवा, पैसे कमवा असा मॅसेज येतोय का?; जाणून घ्या माहिती नाहीतर होईल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -