घरट्रेंडिंगकुन्नूर जिल्हा भाजपसाठी तीर्थक्षेत्र- अमित शाह

कुन्नूर जिल्हा भाजपसाठी तीर्थक्षेत्र- अमित शाह

Subscribe

केरळ येथील कुन्नूर जिल्ह्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांची रॅली आयोजित करण्यात आली. केरळमध्ये मंदिरावरुन राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या आदेशाचे पालन करु शकू असे आदेश न्यायालयाने दिले पाहिजे.

केरळमधील कुन्नूर जिल्हा हे भाजपसाठी तीर्थस्थान असल्याचे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. आज केरळमधील कुन्नूरमध्ये आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर कसून टीका केली आहे. काँग्रेस सरकार मंदिरावरून राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. रॅलीदरम्यान भाजप कार्यालयाचे उदघाटनही त्यांनी केले. ज्या आदेशाचे पालन करु शकू असे आदेश न्यायालयाने दिले पाहिजे. मागील अनेक वर्षापासून सुरु असलेल्या परंपरेला आव्हान करणाऱ्या आदेशामुळे वादग्रस्त स्थिती निर्माण होते.

काय म्हणाले अमित शाह

  • केरळमध्ये १२० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे
  • २६ ऑक्टोबर पासून भाजप, एनएसएस आणि आरएसएस कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याअंतर्गत तुरुंगात टाकण्यात आले
  • भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभा आहे
  • काँग्रेस सरकार स्पेशल फोर्सच्या नावाखाली जबरदस्ती लोकांना तुरुगांत डांबते
  • जर काँग्रेसने आपली मनमानी बंद नाही केली तर तुमची सरकार जास्त दिवस टीकू देणार नाही
  • भाजप कार्यकर्त्यांनी भगवान अयप्पाच्या परंपरेला जपण्याचे काम केले आहे
  • परंपरेचे रक्षण करण्यासाठी भाजपशी जोडल्या जाणे अत्यंत गरजेचे आहे
  • काँग्रेस भगवान अयप्पाच्या मंदीरावरुन राजकारण खेळत आहे
  • केरळमधील मंदिराच्या परंपरेला नष्ट करण्याचे काम सुरु आहे
  • हिंदू धर्मात महिलांना उच्च स्थान दिले जाते. नवरात्र असो किंवा दरसा आम्ही महिलांची पूजा करतो
  • हिंदू धर्मात महिलांवर कधीही अत्याचार होत नाही. हिंदू धर्मातील मंदिरांची वेगवेगळी परंपरा आहे
  • देशात असे बरेच मंदिर आहेत ज्यामध्ये फक्त महिलांच प्रवेश आहे पुरुष तिथे जाऊ शकत नाहीत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -