घरट्रेंडिंगसफाई कामगाराचा भन्नाट 'जुगाड', महिंद्रांनी केलं कौतुक!

सफाई कामगाराचा भन्नाट ‘जुगाड’, महिंद्रांनी केलं कौतुक!

Subscribe

साफसफाई कर्मचाऱ्याने रस्ता स्वच्छ करणाऱ्यासाठी भन्नाट यंत्र बनवले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे उद्योजक आनंद महिन्द्रा यांनी या तरुणाचे कौतुक केले आहे.

आपल्या देशात जुगाडूंची संख्या काही कमी नाही. त्यांच्या इनोव्हेटीव आयडियांचे विविध प्रकार यापूर्वीही आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. अशाच एका अवलियाचा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. साफसफाईसाठी एक तरुण चक्राला झाडू बांधून रस्ता स्वच्छ करत आहे. विशेष म्हणजे त्याच्या कल्पकतेचे ‘महिन्द्रा अँड महिन्द्रा’ कंपनीचे मालक आनंद महिन्द्रा यांनीही कौतुक केले आहे. “भारत देश फक्त जुगाडासाठी तयार झालेला नाही. मात्र या तरुणाने केलेले काम एकदम ‘झकास’ आहे,” असे आनंद महिन्द्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे. सोबतच या तरुणाचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.

मला देशातील अवलियांनी बनवलेल्या जुगाडू वस्तूंचे संग्रहालय बनवायचे आहे. कदाचित हे संग्रहालय चेन्नईतील आमच्या ‘रिकर्व व्हॅली’ येथे बनू शकतं. (सफाई कामगाराच्या यंत्राबाबत बोलताना) हे कोणी आणि कसं बनवलं याची मला काहीही कल्पना नाही. हे यंत्र कामगाराचे कष्ट वाचवण्यासोबतच उत्तमरित्या डिजाइन केलेले आहे. ही गोष्ट मला खूपच आवडली. पंख्यासारखे दिसणारे हे यंत्र अतिशय सुंदर दिसत असून हा तरुणही नम्रपणे त्याचे कर्तव्य बजावत आहे.
– आनंद महिन्द्रा, मालक, महिन्द्रा अँड महिन्द्रा

- Advertisement -

कसे आहे यंत्र

सायकलच्या एका चक्राला चार झाडू बांधण्यात आले आहे. हे चक्र दोन चाकाच्या सहाय्याने चालवले जाते. जसजसे चाक पुढे जात राहते, तसतसे सायकलचे चाक फिरून त्याला जोडलेले चारही झाडू वर्तुळाकार फिरते आणि रस्तावरील कचरा गोळा करते. या प्रक्रियेमुळे रस्ता तर ताफ होतोच. शिवाय कर्मचाऱ्याचे कष्टही वाजतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -