‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या चाहत्यांनी शोधली ८ व्या सिझनची दुसरी मोठी चूक

Mumbai
game of thrones 8th season
आठव्या सीझनमध्ये जॉन स्नो आणि डैनेरियस टारगेरियन यांचे काय होणार?

जगभरातील कोट्यवधी लोकांना वेड लावणारी एचबीओच्या गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेचा सध्या शेवटचा सिझन सुरु आहे. दोन वर्ष गेम ऑफ थ्रोन्सचे चाहते आठव्या सिझनची वाट पाहत होते. या सिझनचे पाच एपिसोड आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. गेम ऑफ थ्रोन्स GOT या नावाने प्रसिद्ध असलेली ही मालिका VFX ग्राफिक्सच्या उच्च दर्जासाठी ओळखली जाते. मात्र चिकित्सक चाहत्यांनी यंदाच्या सिरीजमधून दोन मोठ्या चुका हेरल्या आहेत. चौथ्या एपिसोडमध्ये एका सीनमध्ये स्टारबक्स कॉफीचा कप दिसून आला होता. त्यानंतर आता पाचव्या एपिसोडमधील एक मोठी चूक समोर आली आहे. ज्यामुळे GOT च्या एडिटिंग टिम आणि एचबीओला जगभरात ट्रोल केले जात आहे.

jaimi lannister hand
जेमी लॅनिस्टरचा सध्याचा लूक

GOT मध्ये जेमी लॅनिस्टर नावाचे एक प्रमुख पात्र आहे. पहिल्या एपिसोडपासून जेमीचा मालिकेत वावर आहे. मधल्या काळात जेमीचा उजवा हात कापण्यात आला होता. तेव्हापासून त्याचा उजवा पंजा धातूचा बसवल्याचे दाखवण्यात येत होते. मात्र पाचव्या एपिसोडमध्ये एका सीनमध्ये त्याचा हात पुन्हा दिसतोय. परफेक्ट सिनेमॅटोग्राफीसाठी परिचित असलेल्या GOT कडून एवढी मोठी चुक कशी काय झाली? याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी द बेल्स हा पाचवा एपिसोड प्रदर्शित झाला होता. यात रानी सर्सी ही ड्रॅगन मदर डिनारियसकडून पराभूत होताना दाखवली आहे. हा पराभव होत असताना सर्सीचा भाऊ आणि तिचा तथाकथित प्रियकर जेमी लॅनिस्टर तिला पाठिंबा देण्यासाठी पोहोचतो. आपण हरलोय या भावनेने दोघेही भावूक होऊन एकमेकांना मिठी मारतात. यावेळी सर्सीच्या पाठीवर दिसणारा जेमीचा हात हा पुर्वीसारखा दाखवण्यात आला असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे चाहत्यांनी जेमीचा हात पुन्हा कसा आला यावर प्रश्न विचारला आहे.

game of thrones mistakes
मात्र पाचव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये चुकून त्याचा खराखुरा हात दाखवण्यात आला आहे.

मात्र एचबीओने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आमच्या एडिटिंगमध्ये काहीच चूक झाली नसून जी इमेज आता व्हायरल होत आहे. ती प्रोमोमधील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार हा हात खऱ्याखुऱ्या एपिसोडमध्ये दाखवलेला नाही तर एपिसोडच्या प्रोमोमध्ये तो चुकून राहिला आहे.

निर्माता कंपनीने खरी गोष्ट समोर आणली असली तरी GOT च्या डायहार्ड फॅन्सच्या हे काही पचनी पडलेले नाही. त्यांनी ट्विटरवर एचबीओला खडे बोल सुनावले आहेत.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here