अनुष्काच्या ‘या’ हॉट फोटोवर नेटकऱ्यांचे मीम्स व्हायरल

Mumbai
anushka sharma bikini photoshoot is a viral meme on social media

सध्या सोशल मीडियावर मीम्सचे फॅड प्रचंड प्रमाणात वाढले आहे. नेटकरी कधी कोणत्या फोटोचं रुपांतर मीम्समध्ये करतील हे कळणार देखील नाही. नुकताच अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बिकीनीतला हॉट फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या फोटोला तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीने कमेंट केल्याने या चर्चेला उधाण आलं आहे. या बिकीनीतील अनुष्काच्या फोटोचे रुपांतर मीम्समध्ये झालं असून हे मीम्स पाहून तुम्हाला हसू येईल.

या अगोदर देखील अनुष्काचा ‘सुई धागा’ या चित्रपटातील एका पोझचे मीम्स देखील प्रचंड व्हायरल होते. बिकीनीतील फोटोमध्ये अनुष्का समुद्र किनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे.

View this post on Instagram

Sun kissed & blessed 🧡⛱️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

नेटकऱ्यांनी या पोझची तुलना रस्तांवरील असलेल्या ट्रॅफिक कोनशी, तर अजगराच्या कातडीशी देखील केली आहे.काही मीम्समध्ये तर विराटसोबत क्रिकेटच्या मैदानावर बसलेला अनुष्का बसलेली दाखवण्यात आली आहे.

अद्यापही अनुष्का शर्माकडे कोणताही नवीन प्रोजेक्ट नाही आहे. ‘झिरो’ या शेवटच्या चित्रपटात अनुष्का शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत दिसली होती. सध्या अनुष्का पती सोबत विंडिज दौऱ्यावर आहे. ती आपल्या पती विराट कोहलीसोबत विरंगुळ्याचे क्षण घालवत आहेत.