घरट्रेंडिंग'या' फोटोमुळे अनुष्का झाली पुन्हा ट्रोल

‘या’ फोटोमुळे अनुष्का झाली पुन्हा ट्रोल

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. याचवेळी लंडनमध्ये टीम इंडियाच्या एका शुभेच्छा समारंभात टीमच्या फोटोत अनुष्काने हजेरी लावली आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल व्हाव लागला आहे.

विराट-अनुष्काची जोडी त्यांच्या लग्नाच्या आधीपासून ते आतापर्यंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. भारताचा संघ एखाद्या सामन्यात पराभूत झाला तरी तो अनुष्कामुळे झाला, अशा चर्चांनाही सतत उधान येत असते. आता पुन्हा एकदा विरुष्का सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. भारताचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यावेळी लंडनमधील भारतीय दुतावासाला सदिच्छा भेट दिल्यानंतर दुतावासातील अधिकाऱ्यांनी टीम इंडियासबोत एक फोटो काढला. हा फोटो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. भारतीय संघांच्या फोटोमध्ये अनुष्का पहिल्या रांगेत उभी असलेली दिसून येत आहे. याच फोटोमुळे अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ती संघात आहे का? आणि ती पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे का ? असे मिश्किल प्रश्न विचारत अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे.

 

- Advertisement -

बीसीसीआयलाही नेटीजन्सचा सवाल

भारताय संघाच्या ऑफिशिअल फोटोमध्ये एखाद्या खेळाडूच्या पत्नी असताना त्या फोटोला ‘टीम इंडिया’ असे नाव कसे देऊ शकता, असा सवाल नेटीजन्सकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

अनुष्का उपकर्णधारापेक्षाही महत्त्वाची का?

भारतीय संघाच्या फोटोमध्ये अनुष्काच्या असण्याने ट्रोल होत असलेल्या अनुष्काच्या फोटोला अजून एका प्रश्नाला सामोर जाव लागल आहे. फोटोमध्ये अनुष्का पहिल्या रांगेत तर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मात्र शेवटच्या रांगेत दिसून येत असल्याने हा प्रश्न विचारला जात आहे.


काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा होती की, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामने संपेपर्यंत भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा प्रेयसीला भेटता येणार नसल्याचे आदेश बीसीसीआयकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे काहीच झाले नसून आता भारतीय संघाच्या फोटोतही कर्णधार विराट कोहलीची पत्नी दिसून येत आहे.

वाचा – पत्नी, प्रेयसीपासून दूर राहा – बीसीसीआयचे खेळाडूंना आदेश!

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी ३१ धावांनी पराभूत झाल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. दुसरा कसोटी सामना ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -