घरटेक-वेकयावर्षी अ‍ॅपल कंपनीचे तीन आयफोन

यावर्षी अ‍ॅपल कंपनीचे तीन आयफोन

Subscribe

अ‍ॅपल कंपनी यावर्षी तीन नवीन आयफोन लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. तर, एक आयफोन लो-कॉस्ट एलसीडी मॉडेलचा असणार आहे, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे.

आयफोन एक्सआरची म्हणावी तशी मार्केटमध्ये विक्री झाली नाही. त्यामुळे अ‍ॅपल कंपनी एलसीडी आयफोन आणि दोन नवीन प्रीमियम मॉडेल मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. हे दोन नवीन प्रीमियम मॉडेल आयफोन एक्सएसच्या पुढील रेंजमधील असणार आहेत.

- Advertisement -

मोबाईल मार्केटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने प्रीमियम मॉडेलमध्ये पहिला ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्याचे काम करत आहे. आयफोन एक्सआर आणि आयफोन एक्सएसच्या सक्सेसरमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असणार आहे. या नवीन आयफोनच्या मागीच्या बाजूला दोन कॅमेरे असणार आहेत. याशिवाय, नवीन एलसीडी आयफोनला अपडेट करण्यात येणार आहे.

रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कंपनी 2020 मध्ये आपल्या आयफोनमधून एलसीडी ऑप्शन ड्रॉप करणार आहे. कंपनी 2020 मध्ये फक्त ओलेड ओन्ली आयफोन बाजारात आणणार आहे. कारण,ओलेड टेक्नॉलॉजी चांगल्याप्रकारे काँट्रास्ट आणि कलर रिप्रॉडक्शन ऑफर करते. तर, दुसर्‍या एका लीक रिपोर्टच्या माहितीनुसार, अ‍ॅपल कंपनी आपल्या कॅमेरा सिस्टिममध्ये लाँग डिस्टेंस टाईम ऑफ फ्लाइट टेक्नॉलाजी इंटिग्रेट करण्यावर भर देत आहे. या फीचर्सचा उपयोग सिक्युरिटी, गेम, एग्युमेंटेड रिअ‍ॅल्टी अ‍ॅप्लिकेशन्समध्ये केला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -