मुलीचा असा फोटो शेअर केल्यामुळे ए.आर.रेहमान झाला ट्रोल

प्रियंका चोप्नानंतर आता संगीतकार ए.आर.रेहमानही त्यानी टाकलेल्या फोटोमुळे ट्रोल झाला आहे.

Mumbai
AR-Rahman
ए. आर. रेहमान ट्रोल

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि निकचा बेडरूम मधला फोटो शेअर केला होता आणि त्या फोटोमुळे ती ट्रोल झाली होती. आता संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामळे ते ट्रोलिंगला सामोरे गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी निता अंबानींसोबत रेहमान यांची  पत्नी आणि मुलींचा एक फोटो त्यांनी शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यांच्या मुलीने बुरखा परिधान केलेला दिसतोय. रेहमानने त्याच्या अधिकृत ट्विटरवर हा फोटो शेअर केला होता. निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुबांतील महिला खतिजा, रहिमा आणि सायरा फ्रिडम टू चूज असा हॅशटॅगही या फोटोला देण्यात आले. त्यामुळे संगीतकार ए.आर.रेहमान सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.

View this post on Instagram

@hellomagindia #debutanteball

A post shared by @ arrahman on

यानंतर ए.आर.रेहमानने आणखीन एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या फोटोमधून ए.आर. रेहमानने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, खातिजाने बुरखा परिधान करायचा की नाही, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याविषयी  सांगण्याचा प्रयत्न केला असूनही या फोटोमुळे पुन्हा एकदा ए.आर.रेहमान सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. मात्र, त्याची मुलगी खातिजाने त्यावर तिचे मत व्यक्त केले आहे. त्यावर ती म्हणाली की, मला बुरखा घालण्यासाठी कुणीही जबरदस्ती केली नाही. मी बुरखा परिधान करते कारण मला आवडते. मी अॅडल्ट आहे त्यामुळे मला माहीत आहे की काय परिधान करायचे आणि काय नाही. तिने त्यामधून असही सांगितले की #freedomtochoose हे समजून घेतल्याशिवाय आपले स्वत:चे निर्णय घेऊ नका.

यानंतरही ए.आर.रेहमानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मुलांचा स्पेशल फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये खातिजा खुर्चीवर बसली आहे. रहिमा आणि आमीन तिच्या बाजूला उभे आहेत. एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते, असे सांगण्यात येत आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here