घरट्रेंडिंग'ते' ज्येष्ठ कलाकार ३ दिवस रस्त्याखालीच...

‘ते’ ज्येष्ठ कलाकार ३ दिवस रस्त्याखालीच…

Subscribe

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील ज्येष्ठ कलाकार माईक पर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. माईक हे तब्बल ३ दिवस चक्क रस्त्याखालीच अडकले होते. ७३ वर्षीय माईक यांच्यावर का आली अशी वेळ? नेमका काय घडला होता प्रकार? जाणून घेऊया सविस्तर..

नक्की असं कसं घडलं?

माईक पर हे एका खास असाईनमेंटसाठी रस्त्याखाली असलेल्या चेंबरमध्ये गेले होते. माईक हे एक चित्रकार असून चित्र रेखाटण्यासाठी एखाद्या हटके जागेवर जावं या उद्देशाने ते चक्क रस्त्याखालच्या चेंबरमध्ये जाऊन राहिले होते. या ३ दिवसांच्या कालावधीत माईक यांना केवळ ऑक्सिजन, पाणी आणि चित्रकलेसाठी लागणारं साहित्य इतक्यात गोष्टी पुरवण्यात आल्या होत्या. माईक राहत असलेल्या चेंबरच्या वरुन जाणाऱ्या रस्त्यावर अखंड वाहतूकही सुरु होती. मात्र, अशा अवस्थेतही माईक ३ दिवस तसेच राहिले.

- Advertisement -
चेंबरमधून बाहेर येताना माईक पर (सौजन्य- theaustralian.com)

‘स्टंटबाजी’साठी पत्करली जोखीम

ही घटना उघडकीला येताच, वय झालेल्या माईक यांच्यावर अशी वेळ कुणी आणली? कुणाच्या दबावाखाली येऊन त्यांनी हे पाऊल उचललं? अशाप्रकारचे असंख्य प्रश्न जगभातून उमटत होते. मात्र, माईक हे त्यांच्या स्वेच्छेने चेंबरमध्ये गेल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे माईक यांनी अशाप्रकारचे आगळेवेगळे स्टंट्स याआधीही केले आहेत. इतकच नाही तर अशा स्टंटबाजीमुळे माईक बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत.

ऑस्ट्रेलियन कलाकार- माईक पर (सौजन्य- nytimes.com)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -