घरट्रेंडिंगकोरोनाचा धोका टाळण्यासाठी 'या' सरकारने सेक्सबाबत जारी केल्या गाईडलाईन्स

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ सरकारने सेक्सबाबत जारी केल्या गाईडलाईन्स

Subscribe

ऑस्ट्रेलियातील सरकारने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सेक्सबाबत अजब-गजब गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात आरोग्य तज्ज्ञ प्रत्येक अशी पाऊल उचलत आहे, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल शकतो. जगातील संपूर्ण देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्ये देखील यासंदर्भात वेगवेगळे नियम तयार केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने सार्वजनिक जागेवर कमीत कमी दीड मीटरचे अंतर, हँडवॉश आणि पार्टनरला खोलातील मिठ्ठी मारण्यासारख्या अनेक गोष्टींवर जास्त जोर दिला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य प्राधिकरण बेडरूममधील कपलमधील एका अजब-गजब कोविड सेफ्टी गाईडलाईन्समुळे चर्चेत आले आहे.

न्यू साउथ वेल्स (NSW)च्या आरोग्य वेवसाईटवर ‘प्लेसेफ’ गाईडलाईन्स पाहूण प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांनी सेक्स दरम्यान दीड मीटर अंतर राखण्याची शिफारस केली गेली आहे. बेडरूममध्ये पार्टनरसोबत शारिरीक संबंध ठेवण्याच्या वेळी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील आरोग्य प्राधिकरणाने हद्दच पार केल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

‘सोलो सेक्स’ सर्वात सुरक्षित

नव्या गाईडलाईन्सनुसार, जर तुम्ही अशा व्यक्तिशी जवळीक साधत आहात, जो तुमच्यासोबत पहिल्यापासून राहत आहे. तर घाबरायची काही गरज नाही आहे. दरम्यान लोक कॅज्युअल सेक्स करत आहेत, त्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी काही शिफारस केली आहेत. माहितीनुसार, कोणत्या बाहेरच्या व्यक्तिशी शारिरीक संबंध ठेवणे धोकादायक आहे. कोरोनाच्या संकटकाळात ‘सोलो सेक्स’ला सर्वात सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान आरोग्य तंज्ञानाच्या शिफारसीमध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे. NSW आरोग्य प्राधिकरण आपल्या पार्टनरसमोर निश्चित अंतर ठेवून आपले लैंगिक समाधान पूर्ण करण्याची शिफारस करत आहे. तज्ज्ञांच्या मते, असे करू फक्त कोरोना नाही तर सेक्युअल ट्रान्समिशन डिसीजचे इन्फेक्शन (STI)चा धोका देखील कमी होईल. यासोबत बर्थ कंट्रोल यावर देखील पाहिले जात आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, शुक्राणू किंवा योनिमार्गाद्वारे कोरोनाच्या संक्रमणाचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. व्हायरस रेस्पिरेटरी ड्रॉपेल्ट किंवा लाळेच्या माध्यमातून पसरला जातो, त्यामुळे पार्टनरला किस करण्यापासून वाचण्यासाठी सल्ला दिला आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तीन लेअरचे मास्क आपल्या तोंडावर लावा आणि नाकाला पूर्णपणे कव्हर करा. तसेच लोकांची कंडोम आणि डेंटल डॅम सारख्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय फोन किंवा व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून हॉट मेसेज किवा इन्टिमेट होण्याचा सल्ला दिला गेला असून पार्टनरसोबत एका बेडरूम किंवा शहरात असल्यावर त्याच्यासोबत फोन किंवा व्हिडिओ चॅटवर टाईम स्पेंड करू शकता, असे आस्ट्रेलियन सरकारने सांगितले आहे.


हेही वाचा – ‘ब्रा’च्या साईजवरुन नवरा बायकोत राडा, पत्नीकडून घटस्फोटाची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -