घरट्रेंडिंगधोनी निवृत्त हो - भाजप मंत्री, नेटिजन्सनी घेतला समाचार

धोनी निवृत्त हो – भाजप मंत्री, नेटिजन्सनी घेतला समाचार

Subscribe

प्रत्येक खेळाडुच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार येतात. अनेकदा खेळाडू काही कालावधीसाठी आऊट ऑफ फॉर्म होतो. त्या कालावधीत अनेकजण त्या खेळाडूवर टिकादेखील करतात. भारताचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर आता अशी परिस्थिती ओढवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून धोनी खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टिकादेखील केली आहे. धोनीला त्याच्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. काल विशाखापट्टणम येथे झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनी चाचपडत खेळत होता. धोनीने कशाबशा २० धावांची खेळी केली. त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ज्या २० धावा त्याने केल्या त्यादरम्यान तो बराच तणावाखाली दिसत होता. ओबेद मॅक्कायच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. धोनीच्या या सातत्याने होणाऱ्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचादेखील समावेश आहे. या मंत्र्याने धोनीला धारेवर धरले आहे. या केंद्रिय मंत्र्याने त्याला चक्क निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

वाचा – ‘चॅम्पियन’ ड्वेन ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

- Advertisement -

कोण आहेत ते मंत्री?

केंद्रिय मंत्रीमंडळातील अवजड उद्योग मंत्री बाबुल सुप्रियो यांनी धोनीच्या वाईट खेळावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धोनीच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय धोनीला निवृत्तीचा सल्लादेखील दिला आहे. ते स्वतःला धोनीचा फॅन असल्याचे सांगतात. तरिदेखील त्यांनी धोनीवर टिका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सुप्रियो?

सुप्रियो यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे की, ”धोनी आजच्या सामन्यात जसा बाद झाला ते माझ्या पचनी पडलेले नाही. मी त्याचा फॅन आहे, धोनीने त्याच्या खेळाचा विचार करायला हवा. त्याने आता निवृत्ती घ्यायला हवी.”

शांत बसतील ते धोनीचे फॅन्स कसले?

या संपूर्ण प्रकारानंतर शांत बसतील ते धोनीचे फॅन्स कसले. धोनीच्या फॅन्सनी सुप्रियो यांचा चांगलाच समाचार घेतला. धोनी फॅन्सनी सुप्रियो यांना ट्रोल करायला सुरुवात केली. सुप्रियो यांनी ट्विट केल्यापासून धोनीचे फॅन्स त्यांच्यावर तुटून पडले आहेत. अनेक फॅन्सनी त्यांना खोचकपणे टोमणेहीदेखील मारले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -