चला काका घरी सोडतो; राज ठाकरे ट्रोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या या प्रचारावर आता राज ठाकरे चांगलेच ट्रोल झाले आहेत.

mumbai
bjp supporters troll raj thackeray after massive success
राज ठाकरे ट्रोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाव रे तो व्हिडिओम्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांना मोठ्या संख्येने गर्दी देखील झाली होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही. राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. तरी याचा परिणाम मतदानावर झालेल्याचे चित्र मतमोजणी दरम्यान दिसत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रचार करणारे राज ठाकरे सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.