घरट्रेंडिंगप्रिया वारियरच्या 'या' चित्रपटाविरोधात बोनी कपूर यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

प्रिया वारियरच्या ‘या’ चित्रपटाविरोधात बोनी कपूर यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

Subscribe

अभिनेत्री प्रिया वारियरचा आगामी चित्रपटा विरोधात श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या जीवनावर आधारित आहे.

आपल्या डोळे मिचकावण्याच्या एका छोट्याश्या प्रसंगाने इंटरनेटवर सेंसेशन बनलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा नविन चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला. या टीझर विरोधात बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. प्रियाचा हा नवीन चित्रपट श्रीदेवीच्या जीवनावर आधारित असेल. “श्रीदेवी बंगलो” असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात प्रिया ही मुख्य भुमिकेत दिसणार आहे. श्रीदेवीच्या जीवनातील प्रसंगावर आधारित हा चित्रपट आहे. मंगळवारी हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ही कारवाई  करण्यात आली. या कायदेशीर नोटीसबद्दल दिग्दर्शक प्रशांत मम्बुली यांनी माहिती दिली आहे.

काय आहे टीझरमध्ये 

चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रिया वारियरचे नाव श्रीदेवी असल्याचे दाखवले आहे. चित्रपटात प्रिया एक यशस्वी अभिनेत्रीच्या रुपात दाखवली आहे. प्रिया टीझरमध्ये मद्यपान आणि धुम्रपान करते याच बरोबर प्रिया मानसिक तणावात असल्याचे दाखवण्यात आले आहे. टीझरच्या शेवटी प्रियाचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री श्रीदेवीची प्रतिमा या चित्रपटामुळे खराब होणार म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

बाथ टबमध्ये झाला होता मृत्यू

लोकप्रिय सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला यांच्या लग्नसमारंभासाठी श्रीदेवी आणि पती बोनी कपूर आपली मुलगी खुशी कपूरबरोबर दुबईत गेले होते. दुबईतच बाथटबमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर अनेकांनी त्यांचा खून झाल्याचेही वक्तव्य केले होते. मात्र आता या घटनेवर आधारित चित्रपट येत असल्यामुळे त्यामध्ये या घटनेला चित्रपटाचे रुप देऊन सादर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -