घरट्रेंडिंग'आईसाठी योग्य वर हवाय....' मुलाची फेसबुक पोस्ट व्हायरल!

‘आईसाठी योग्य वर हवाय….’ मुलाची फेसबुक पोस्ट व्हायरल!

Subscribe

सध्या झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई ही मालिका सध्या खूप गाजत आहे. मालिकेचा वेगळा विषय हे या मागचं मूळ कारण आहे. यामालिकेत घरी आलेली सून आपल्या एकट्या पडलेल्या सासूसाठी जोडीदार शोधतेय. उतार वयात कोणीतरी सोबत असवं म्हणून सूनच करवली होऊन आपल्या सासूसाठी वर शोधला आहे. पण सगळं आपण रोज मालिकेत बघत असलो तरी खऱ्या आयुष्यातसुध्दा एका मुलाने आपल्या आईसाठी वर शोधायला सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका तरूणाने सोशलमिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आईसाठी उत्तम वर हवा आहे अशी मागणी केली आहे.

हुगली येथील गौरव अधिकारी आपल्या ४५ वर्षीय विधवा आईसाठी योग्य तो वर शोधत आहे. तरूणाने फेसबुकवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने काही अट लिहील्या आहेत. गौरव अधिकारी हा तरूण हुगली जिल्ह्यातील फ्रेंच कॉलनीमध्ये राहतो. गौरवच्या आईचे वय ४५ वर्ष आहे. त्यांच्या पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. या मुलाने पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, मी दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो त्यामुळे आई घरी एकटीच असते. तीला प्रचंड एकटेपणा वाटतो. म्हणून तीच्यासाठी चांगल्या वराच्या शोधात आहे.

- Advertisement -

हे वाचा – मुलगी शोधते ५० वर्षांच्या आईसाठी नवरा; सोशल मीडियावर कौतुक

गौरवने १० नोव्हेंबरला ही फेसबुकपोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्य़ा पोस्ट लाईक्स,शेअर आणि कमेंट्सा पाऊस पडत आहे. या आधी दोन मुलींदेखील आपल्या आईला योग्य वर हवाय अशी पोस्ट सोशलमिडीयावर लिहीली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -