घरट्रेंडिंग'ही' जीन्स घाला आणि पोटातला गॅस बिनधास्त सोडा!

‘ही’ जीन्स घाला आणि पोटातला गॅस बिनधास्त सोडा!

Subscribe

ब्रिटनच्या श्रेडीज या कंपनीने अशी जीन्स आणि अंडर गारमेंट बनवले आहेत, जे घालून तुम्ही पोटातला गॅस बाहेर सोडलात, तरी त्याचा वास बाहेर पसरणार नाही!

पोटात गॅस झालेला असताना आपण सहसा बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतो. अशा अवस्थेमध्ये ऑफिसला जाणं म्हणजे तर फारच मोठी रीस्क! अनेकदा विनोदामध्ये ‘मसाल्याचे पदार्थ खाऊ नका, नाहीतर इतरांना त्रास होईल’, असे शेरे मारले जातात. कारण पोटात गॅस झाला तर त्याचा इतरांना त्रास तर होणारच ना! आणि तसं तर झालं, तर आपल्या इमेजचा तर चारचौघांत बट्ट्याबोळ झालाच म्हणून समजा. पण ब्रिटनमधल्या एका कंपनीने यावर एक जालीम उपायच शोधून काढलाय. त्यांनी म्हणे अशी जीन्स बनवली आहे, जी घातल्यामुळे तुमच्या पोटातला गॅस बाहेर पडला, तरी त्याचा वास मात्र पसरणार नाही. आता ही वास नक्की जाणार कुठे? याचं उत्तर जरी या कंपनीने दिलं नसलं, तरी तो बाहेर पडणार नाही असा मात्र त्यांचा छातीठोक दावा आहे! ‘टाईम्स नाऊ’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ऑकवर्ड स्थितीचा पासवर्ड!

‘श्रेडीज’ असं ब्रिटनमधल्या या कंपनीचं नाव आहे. त्यांचा दावा जरी अजब असला आणि सुरुवातीला ऐकायला जरी विचित्र वाटत असला, तरी अनेकांनी अशा ‘ऑकवर्ड’ वाटणाऱ्या परिस्थितीचा सामना केल्याचं ही मंडळी कबुल करतील. उघडपणे नसले करत, तरी खासगीत तर नक्कीच करतील! त्यामुळे अशा परिस्थितीत ही जीन्स जर खरंच उपयोगी ठरत असेल, तर या मंडळींना ती नक्कीच हवी असेल.

- Advertisement -

असा होणार दर्प नाहीसा…

‘श्रेडीज’ने बनवलेल्या या जीन्समध्ये मागच्या बाजूला कार्बनचा वापर करून बनवलेलं एक विशिष्ट प्रकारचं पॅनल आहे. या पॅनलमुळे अपचनातून तयार झालेल्या गॅसला येणारा विशिष्ट प्रकारचा दर्प फिल्टर होतो. त्यामुळे त्याचा वास बाहेर पसरत नाही, असं कंपनीने आपल्या वेबसाईटवर नमूद केलं आहे. जीन्ससोबतच या कंपनीने या प्रकारचे अंडर गारमेंट्सही तयार केले आहेत. या कंपनीची ‘फार्ट विथ कॉन्फिडन्स’ अशी टॅगलाईनच आहे!

पोटातला गॅस महागात जाणार!

आता ही जीन्स किंवा हे अंडरगारमेंट्स तुम्हाला एवढा कम्फर्ट मिळवून देणार असतील, तर त्याची किंमतही तशीच असणार यात शंका नाही. या कंपनीने वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे या फ्लॅट्युलेन्स फिल्टरिंग जीन्ससाठी भारतीय चलनामध्ये ७ हजार रुपये प्रति जोडी इतकी किंमत मोजावी लागणार आहे. ७ वेगवेगळ्या साईजमध्ये या जीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर एका अंडरगारमेंट्ससाठी तब्बल १४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -

ऐकायला, वाचायला कितीही ऑकवर्ड किंवा विचित्र वाटत असलं, तरी ही बाब फारच महत्त्वाची आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गॅस थांबवून ठेवल्यामुळे अनेकदा तो गॅस अडकून पडल्याने छातीत दुखणे किंना ह्रदयविकाराचा झटका येण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे कपडे त्यामध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील. त्यासाठी तेवढी किंमतही मोजावी लागणार आहे. सो व्हॉट यु आर वेटिंग फॉर? जस्ट ‘फार्ट विथ कॉन्फिडन्स’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -