Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ट्रेंडिंग ओळखा, किती हत्ती पाणी पितायत? फोटोत नाही कळलं तर व्हिडिओ बघा

ओळखा, किती हत्ती पाणी पितायत? फोटोत नाही कळलं तर व्हिडिओ बघा

New Delhi
elephant drink water
ओळखा पाहू किती हत्ती आहेत?

सोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यचकित करणारे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कुटुंबातील हत्ती सलग एका ओळीत नदी किनारी पानी पित आहेत. मात्र नक्की किती हत्ती एका ओळीत उभे आहेत, हे ओळखणे कठीण होत आहे. अनेकांनी या फोटोला निरखून बघत अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांचेच अंदाज चुकले.

ट्विटरवरील वाईल्ड लेन्स नावाच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही दिवसांपूर्वी आम्ही ७ हत्ती एका फ्रेममध्ये आहेत, असा फोटो टाकला होता. मात्र अनेकांना तो फोटो समजला नाही. आता आम्ही त्याचा व्हिडिओ टाकत आहोत.”

वाईल्ड लेन्स ट्विटरवर काही दिवसांपूर्वी हत्तींचा हा फोटो अपलोड करण्यात आला होता. मात्र अनेकांचा या फोटोवर विश्वासच बसला नाही. कारण कितीही निरखून पाहिलं तर फोटोत ५ हत्ती दिसत आहेत. मात्र ७ हत्ती असतील असं कुणालाच वाटलं नव्हतं.

आता ट्विट केलेल्या ७० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हत्ती पाणी पिऊन जात असताना मोठ्या हत्तींच्या मधून चालत असलेली दोन पिल्ल आपल्याला दिसून येतात. त्यानंतर हत्ती आणखी पुढे जात असताना दोन हत्तींच्या मधे एक छोटसं पिल्लू चालत जात असल्याचं दिसतं. सातव्या हत्तीचा शोध घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आणखी निरखून पाहावा लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here