Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग मला राग येतोय, तुझा टकला करेन: चिमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल

मला राग येतोय, तुझा टकला करेन: चिमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीय.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. गेल्या काही दिवसांपासून एका लहान मुलाचा केस कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच हसू येत आहे. लहान मुलांना सलुनमध्ये केस कापायला नेणे म्हणजे पालकांसाठी खूप मोठे काम असते. या व्हायरल व्हिडिओतही असाच काही प्रकार पहायला मिळतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलाला केस कापण्यासाठी सलुनमध्ये बसवले आहे. पण मुलाला काही केस कापून घ्यायचे नाहीत. तो मोठ्या मोठ्या ओरडून ‘अरे क्या कर रहे हो?पूरे बाल काट दोगे क्या ?’ असे म्हणत आहे. मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हसणे आवरत नाही. केस कापणारा त्याला शांत करण्यासाठी त्याचे नाव विचरतो. त्यावर ‘मेरा नाम अनुश्रृत हैं ओर अनुश्रृत बाल काटना नही चाहता’ असं तो मोठ्याने ओरडून सांगत आहे. या व्हिडिओमध्ये छोटा अनुश्रृत ओरडून ‘अरे ज्यादा बाल क्यो काट रहे,मत करो यार, अरे यार ‘असं म्हणत आहे.

- Advertisement -

छोट्या अनुश्रृतला त्याचे केस कापायचे नाहीत. त्यामुळे त्याला जबरदस्ती केस कापायला बसवलेले दिसत आहे. ‘मी तुला मारेन. मला राग येतोय तुझा टकला करेन’ असे हा चिमुरडा म्हणत आहे. सोशल मीडियावर या निरागस अनुश्रृतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘प्रत्येक आई वडिलांना असा संघर्ष करावा लागतो’ असे म्हणत अनुश्रृतच्या वडिलांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. २२ नोव्हेंबरला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. ८ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.


हेही वाचा – ‘रुद्रकाल’ रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -