Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग लघवी कुठून येते? हे शोधण्यासाठी मुलाने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली तार

लघवी कुठून येते? हे शोधण्यासाठी मुलाने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली तार

Related Story

- Advertisement -

लघवी कुठून येते शोधायला एका १३ वर्षांच्या मुलाने एक विचित्र मार्ग अवलंबला आहे. त्याने प्रात्यक्षित करण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये चक्क २ फूट लांब वीजेची तार घातली आहे. ही घटना चीनमधील डोंगुआन येथील सॉन्गशन लेक सेंट्रल हॉस्पिटलमधील आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनमधील एका १३ वर्षांच्या मुलाने लघवी कुठून येते हे जाणून घेण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये वीजची तार घातली आहे. गेल्या महिन्यात मुलाच्या लघवीतून रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांकडे दाखवण्यात आले होते. डॉक्टरांनी जेव्हा त्याचे एक्सरे काढले तेव्हा ते हैराण झाले. मुलाच्या मूत्राशयात एक तार दिसत होती.

- Advertisement -

याबद्दल डॉक्टरांनी मुलाला विचारले असता त्याने सांगितले की, ‘३ महिन्यांपूर्वी लघवी करण्याचा मार्ग शोधण्यासाठी वीजेची तार प्रायव्हेट पार्टमध्ये घातली होती. परंतु जेव्हा ती घातली तेव्हा ती हातात सुटून आतमध्ये गेली. भीतीपोटी त्याने घरातील सदस्यांना याबाबत सांगितले नाही.’

डॉक्टरांना या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी एक तास लागला. मूत्राशयातून सुमारे ७० सेमी लांब तार बाहेर काढली. महत्त्वाचे म्हणजे या तारेमुळे मुलाला कोणतीही इजा झाली नाही.


- Advertisement -

हेही वाचा – नवऱ्याने मॅचिंग साडी, लिपस्टिक अन् बांगड्या न दिल्यामुळे बायकोने घेतली पोलिसात धाव


 

- Advertisement -