घरट्रेंडिंग१४ नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होत होता बालदिन

१४ नोव्हेंबर ऐवजी ‘या’ तारखेला होत होता बालदिन

Subscribe

आज 'चिल्ड्रन डे' म्हणजेच 'बालदिन' आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निम्मित्त हा दिवस साजरा केला जातो. मात्र पूर्वी बालदिन वेगळ्या तारखेला साजरी केला जात होता.

आज चिल्ड्रन डे म्हणजेच बालदिन आहे. भारतात हा दिवस पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त साजरी केला जातो. या दिवशी लहान मुलांचे अधिकार, त्यांचा संभाळ आणि शिक्षण या बद्दल जागरूकता पसरवली जाते. पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम होते यासाठी त्यांची जयंती (१४ नोव्हेंबर)चा दिवस बालदिन म्हणून साजरी करतात. पंडित नेहरूंना यासाठी चाचा नेहरू म्हणून संबोधले जात होते. पडिंत नेहरू यांनी लहानमुलांच्या शिक्षणावर आणि संभाळावर अधिक भर दिला होता. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य असे ते म्हणत. यासाठी देशाचे भविष्य जर सुधरवाचे असेल तर मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा आदर्श म्हणून आजही बालदिवस देशभरात मोठ्या जोमाने साजरी केला जातो.

२० नोव्हेंबरला साजरा केला जात होता बालदिन

वर्ष १९२५ पासून बालदिन साजरा केला जात आहे. १९५३ मध्ये बालदिनाला जगभरात मान्यता मिळाली होती. संयुक्त राष्ट्र संघाने बालदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. इतर देशांप्रमाणे भारतातही हा दिवस २० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत होता. मात्र, १९६४ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरी केला जातो.

- Advertisement -

गुगलनेही दिल्या शुभेच्छा

गुगल नेहेमीच खास दिवशी डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करत असतं. यावेळीही गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक विशेष डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. याच बालदिना निमित्त गुगलने बच्चे कंपनीला शुभेच्छा दिल्या आहे. यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. यात ग्रह, अवकाश यान, आकाश गंगा अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. जिज्ञासू वृत्तीने निरिक्षण करणारी लहान मुलगी या डुडल मध्ये दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -