घरट्रेंडिंगसावधान...कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक

सावधान…कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक

Subscribe

कलर्ड टॅटू शरीरासाठी घातक ठरत असल्याचे एका रिसर्चमधून समोर आले आहे.

पूर्वीच्या काळात विशिष्ट संस्कृती म्हणून शरिरावर गोंदवले जायचे. मात्र, आता याच गोंदवण्याला आधुनिक काळात टॅटू या नावाने ओळखले जाते. सध्या युवा पिढीमध्ये टॅटूचा ट्रेंड अधिक प्रमाणात असून याची क्रेझ तरुणाई पासून ते महिलांपर्यंत सर्वांमध्येच वाढली आहे. आजकाल स्टाईलिश दिसण्यासाठी कपडे, फुटवेअर, मेकअप, एक्सेसरीज आणि हेअर स्टाईल हे सोडून टॅटू ही एक नवीन हटके फॅशन सध्या चर्चेत असून कलर्ड टॅटूला अधिक मागणी आहे. सध्या कलर्ड टॅटूची क्रेझ वाढली आहे. परंतु, हे कलर्ड टॅटू शरीरासाठी घातक ठरत असल्याचे एका रिसर्चमधून समोर आले आहे. फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये युरोपियन सिंक्रोट्रॉन रेडिएशन फॅसिलिटीच्या वैज्ञानिकांना टॅटू काढून घेणाऱ्या लोकांच्या लिम्फ नोडमध्ये (इम्यून सिस्टीमचा एक भाग) क्रोमियम मेटल्स आढळले. या रिसर्चमधून हे समोर आले की, हा धातू शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण करु शकतो.

- Advertisement -

मेटलचे कण तुमच्या स्कीनमध्ये प्रवेश करतात

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, कलर्ड टॅटू तुमच्या लिम्फ नोड्समध्ये जड केमिकल्स रिलीज करु शकतात आणि शरीरातील शाईमुळे अॅलर्जी निर्माण होऊ शकते. या रिसर्चमधून असे समोर आले आहे की, टॅटू काढण्यात येणाऱ्या सुईने छोटे छोटे मेटलचे कण तुमच्या स्कीनमध्ये प्रवेश करतात आणि लिम्फ नोड्समध्ये फिरु लागतात. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जी होऊ शकतात. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकराच्या अॅलर्जीवरील उपचारही सोपे नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

लिम्फ नोड हा इम्यून सिस्टीमचा एक भाग असून यामध्ये मेटल्सचे छोटे कण आढळले आहेत. या कलर टॅटूमध्ये जे मेटल्स असतात. हे मेटल सुईच्या माध्यमातून शरीरात जातात. तसेच पांढऱ्या रंगांसाठीही शाईचा वापर केला जातो. ज्याला टायटेनियम डॉयऑक्साइड म्हटले जाते आणि कोणताही रंग तयार करताना पांढऱ्या रंगाला गर्द रंगांमध्ये मिश्रित केले जाते.

८५० लोकांवर करण्यात आला रिसर्च

हा रिसर्च ८५० लोकांवर करण्यात आला आहे. फ्रान्सच्या ग्रेनोबल युरोपियन सिंक्रोट्रॉन रेडिएशन फॅसिलिटीच्या वैज्ञानिकांना टॅटू काढून घेणाऱ्या लोकांच्या लिम्फ नोडमध्ये क्रोमियम धातू आढळला आहे.

ईएसआपएफचे वैज्ञानिक इनेस श्राइवर यांच्यानुसार, टॅटूमध्ये वापरले जाणारे आयर्न, क्रोमियम आणि शाईचे रंग यांच्यात संबंध शोधण्यासाठी आम्ही अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगानंतर असे दिसले आहे की, टॅटू काढताना वापरण्यात येणाऱ्या सुईने छोटे छोटे धातुचे कण त्वचेत प्रवेश करतात आणि लिम्फ नोडमध्ये वाहू लागतात. त्यामुळे अॅलर्जी होण्यास सुरुवात होते.


हेही वाचा – महिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -