स्पर्धा कंपन्यांची, चांदी ग्राहकांची

Mumbai
कमी किमतीत आकर्षक मोबाईल प्लान

मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा आता ग्राहकांना चांगलाचा फायदा होऊ लागला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांनी आपल्या प्लॅनची किमत कमी केली आहे. एअर टेल, वोडा फोन, जिओ यांनी २०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे रिचार्ज प्लान्स आणले आहेत.

एअरटेल कंपनीने १९९ रुपयात १.५ जीबी डेटा प्रतिदिन दिला आहे. हा प्लान २८ दिवसांसाठी आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस मिळत आहेत. याशिवाय ग्राहकांना रोमिंगसह अनलिमिटेड फ्री इनकमिंग आणि आऊटगोइंग मिळणार आहे. तसेच १६९ रुपयांच्या प्रिपेड रिचार्जवर १ जीबी डेटा आहे. २८ दिवसांसाठी हा प्लान असून अनलिमिटेड व्हाईस कॉल, प्रतिदिन १०० एसएमएस आहेत.

रिलायन्स जिओने आपल्या १८९ रुपयांच्या प्रिपेड प्लानवर प्रत्येक दिवशी २ जीबीचा डेटा दिला आहे. हा प्लान २८ दिवसांंसाठी असून अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस आहेत. तसेच अनलिमेटेड फ्री इनकमिंग आणि आऊटगोइंग कॉलची सुविधा आहे. जिओच्या १४९ रुपयांच्या प्रिपेड प्लानवर प्रतिदिन १.५ जीबी डेटा आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस आहेत.

वोडाफोनच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, प्रतिदिन १०० एसएमएस आहेत. हा प्लानही २८ दिवसांसाठी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here