घरट्रेंडिंगVideo: सलमान खानच्या गाण्यावर व्हायरल होतोय 'या' जोडप्याचा शुद्ध देसी रोमांस

Video: सलमान खानच्या गाण्यावर व्हायरल होतोय ‘या’ जोडप्याचा शुद्ध देसी रोमांस

Subscribe

हा व्हायरल व्हिडिओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने कौतुक केले.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील गाणी चांगलीच गाजली होती. अजूनही या चित्रपटातील गाणी ऐकायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील एका गाण्यावरील गावरान जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हे जोडप ‘दिल दिवाना’ या गाण्यावर आपल्या अंदाजात नाचत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ खूप आवडत असून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने देखील या व्हिडिओचं कौतुक केलं आहे. या जोडप्याने हुबेहुबे गाण्यात असलेला पेहराव केला आहे. या दोघांनी हा व्हिडिओ शेतात शूट केला आहे.

- Advertisement -

अभिनेत्री रवीना टंडन ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. म्हणून तिने सलमान खानच्या गाण्यावरील या जोडप्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसंच सोशल मीडियावरील हा गोंडस व्हिडिओ असल्याचं तिने म्हटलं आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहून नेटकरी काय म्हणाले? ते पाहा


हेही वाचा – कुत्र्याच्या कपाळाला शेपटी कधी पाहिलीये का? मग पाहाच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -