चक्क गायीने पाळले वाहतुकीचे नियम; पहा ‘हा’ व्हिडिओ

तुम्ही कधी प्राण्यांना वाहतुकीचे नियम पाळताना पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ नक्की पहा. प्रिती झिंटाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

Mumbai
cow obey traffic rules in preity zinta viral video animals better than humans says internet
चक्क गायीने पाळले वाहतुकीचे नियम; पहा 'हा' व्हिडिओ

अनेक जणं प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळत नाही किंवा वाहतुकीचे नियम पाळण्यास कंटाळा करतात. मात्र, तुम्ही कधी प्राण्यांना वाहतुकीचे नियम पाळताना पाहिलं आहे का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. चक्क गायीने लाल सिग्नल पाहून इतर वाहनांसोबत थांबून हिरव्या सिग्नलची वाट पाहत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने तिच्या टि्वटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये गाय एका समजूतदार माणसा प्रमाणे उभी राहून हिरव्या सिग्नलची वाट पाहताना दिसत आहे. त्यामुळे गायीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रिती झिंटाने हा व्हिडिओ शेअर करत असं लिहिलं आहे की, ‘या गायीला बघून शिका वाहतूकीचे नियम कसे पाळतात. लोकांच सोडा आमची गाय पण वाहतूकीचे नियम पाळते.’

नक्की वाचा भारतात पुन्हा नोटबंदी? दोन हजाराची नोट बंद होणार?

नेटकऱ्यांनी प्रितीने हा शेअर केलेल्या व्हिडिओवर चांगलाचा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ५६ हजार वेळा पाहिला गेला आहे. प्रितीच्या चाहत्यांनी या व्हिडिओला ६ हजारहून अधिक लाईक केलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ खूप प्रमाणात शेअर केला आहे.

हेही वाचाराखी सावंतचा पती रितेश,राखी विषयी म्हणतो….

एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, ‘मला असं वाटतं तिथे असलेल्या लोकांनपेक्षा गायीला जास्त वाहतूकीचे नियम माहित आहेत.’ पहा नेटकऱ्यांनी या व्हिडिओ दिलेल्या प्रतिक्रिया…

हेही वाचाश्रद्धा कपूरने चक्क चाहत्याला केली किस!