घरट्रेंडिंगलपतछपत पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान! लाखो युजर्सचा खासगी डेटा लीक

लपतछपत पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान! लाखो युजर्सचा खासगी डेटा लीक

Subscribe

तुम्ही जर लपतछपत पॉर्न व्हिडिओ बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.

पॉर्न व्हिडिओ जगभरात सर्वाधिक प्रमाणात पाहिले जातात. लोकांना लपतछपत अशाप्रकारे व्हिडिओ बघायचे असतात. लोकांची खासगी माहिती लीक होणार नाही, अशी शाश्वती काही पॉर्न साईट्स देत असतात. मात्र, लपतछपत बघणाऱ्या वापरकर्त्यांचा संपूर्ण डेटा लीक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे डेटा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अगदी फेसबूक, गूगल या कंपन्यांना देखील वापरकर्त्यांचा डेटा लपवून ठेवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या पॉर्न वेबसाईट्सला देखील यात अपयश आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ‘द नेक्स्ट वेब’ने माहिती दिली आहे. पॉर्न वेबसाईट ‘ल्यूसीयस’मध्ये फार मोठी गडबड झाली. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. या वेबसाईटवर वापरकर्ते आपली माहिती लपवून पॉर्न व्हिडिओ टाकू किंवा पाहू शकतात.

वीपीएनमेंटरने लावला तपास

वापरकर्त्यांचा डेटा लीक होण्याच्या घटना याअगोदरही उघडकीस आल्या आहेत. पॉर्न वेबसाईटवरही अशाप्रकारच्या घटना घडत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आता ही बाबा स्पष्ट देखील झाली आहे. ‘वीपीएनमेंटर’ने हा तपास लावला आहे. वीपीएनमेंटरचे शोधकर्ते या वेबसाईटवरील वापरकर्त्यांची खासगी माहिती शोधण्यात यशस्वी झाले आहेत. खासगी माहिती म्हणजे वापरकर्त्यांचा ई-मेल आयडी, लिंग, देश, आवडी-निवडी. या शोधकर्त्यांना कोणत्या वापरकर्त्याने कोणती पोस्ट केली आहे, काय कमेंट आणि शेअर केले आहे, त्याचबरोबर वापरकर्त्यांचे खरे नाव, त्यांच्या अकाउंटविषयी देखील माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

पॉर्न वेबसाईटवर सरकारी इमेल लॉगिन

‘वीपीएनमेंटर’ने याबाबात माहिती दिली. याशिवाय ‘कोणताही हॅकर सहज माहिती मिळवून वापरकर्त्याला ब्लॅकमेल करु शकतो. परंतु, याबाबत आम्ही संशोधन केल्यामुळे ही माहिती आता सुरक्षिचत आहे’, अशी माहिती वीपीएनमेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय ‘ल्यूसीयस’सारख्या पॉर्न साइट्सचा डेटा लीक होणे ही धक्कादायक बाब आहे. ही जगातील एक क्रमांकाची पॉर्न वेबसाईट आहे. त्यामुळे अशाप्रकारे डेटा लीक होणे अनपेक्षित आहे. वीपीएनमेंटरच्या शोधकर्त्यांना १५ ऑगस्ट रोजी ही बाब निदर्शनास आली आणि १९ ऑगस्ट रोजी ही बाब ल्यूसीयस वेबसाईटला सांगण्यात आली. ‘चिंतेचा मुद्दा म्हणजे बरेच वापरकर्ते अधिकृत सरकारी ईमेलवर ल्यूसीयसवर वापरकर्ते आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इटली, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया मधील वापरकर्त्यांकडून याची उदाहरणे सापडली’, असे वीपीएनमेंटरचे अधिकारी म्हणाले.


हेही वाचा – पॉर्न व्हिडिओंमधून मला काहीच पैसे मिळाले नाहीत – मिया खलिफा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -