एक प्रेमाचे नाते असेही

न्यायालयाने ३७७ कायदा पारित केल्यानंतर समलैंगिक संबधांवर उघडपणे भाष्य करण्यात येऊ लागले. यावर अनेक चित्रपट आणि नेटफ्लिक्सवर मालिका बनल्या. या व्हॅलेंटाईन्स डे रोजी प्रेमाबद्दल त्यांच्या भावना जाणून घेऊया.

Mumbai
heart
प्रातिनिधिक फोटो

व्हॅलेंटाईनचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी अनेक प्रेमी जोडपे प्रेमउत्साह साजरा करताना दिसतात. या जोडप्यांमध्ये बहुतेकवेळी स्त्री-पुरूष असतात. समाजाच्या दृष्टीने हे स्त्रि-पुरूष दरम्यानचे प्रेमसंबध सर्वसाधारण आहे. न्यायालयाने ३७७ कायदा पारित केल्यानंतर समलैंगिक संबधांवर उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. या विषयावर चित्रपट आणि नेटफ्लिक्सच्या मालिका बनवण्यात आल्या. लोकांना या चित्रपटांना आणि मालिकांना चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये प्रेक्षकांसमोर समलैंगिक संबंधांचे उघडपणे प्रदर्शन करण्यात आले. मात्र समलैंगिक लोकांचे प्रेमही सामान्य लोकांसारखे असेल का? त्यांना प्रेम आणि वासना यामधला फरक कळतो का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा त्यांच्याकडे तिरस्कार आणि वासनेच्या नजरेने बघितले जाते. त्यांच्या प्रेमसंबधांना सामान्य लोक हे वेगळ्याच नजरेने बघतात. त्यामुळे अशा संबधांवर प्रकाश टाकणे बदलत्या काळाची गरज बनली आहे.

– सोनाली दळवी, (तृतीयपंथी, कार्यकर्ता)

sonali Dalvi
सोनाली दळवी, (तृतीयपंथी, कार्यकर्ता)

प्रेमाला कोणतीही जात, धर्म, लिंगभेद नसतो. प्रेम हे कोणावरही होऊ शकते. हृदयातील भावना बाहेर निघून ती दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचते यालाच प्रेम म्हणतात. समाजात काहींना मरेपर्यंत प्रेम मिळत नाही. मी माझा व्हॅलेंटाईन्स डे आमच्या एलजीबीटी समाजात साजरा करणार आहे. ज्या समाजात माझ्या लैंगिकतेवर कोणीही प्रश्नचिन्ह उठवणार नाही. माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे समाजाला माझ्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार कोणी दिले. “प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.” लोकांचा मानसिकता बदलली पाहिजे प्रेमाम्हणजे वासना नाहीत. प्रेम मला माझ्या आई-वडिलांकडून हवयं, भाऊ- बहिणींकडून हवयं. कुटुंबाकडून प्रेम आणि आधार मिळणे हे फार गरजचे असते.

 

– निकी रे, (बायोसेक्स्यूअल, वुमन स्टँडअप कॉमेडियन)

nikki ray
निकी रे, (बायोसेक्स्यूअल, वुमन स्टँडअप कॉमेडियन)

प्रेमाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. प्रेम आंधळ नसते, प्रेमात अपार भावना असतात. प्रेम कोणावर करतो यापेक्षा महत्वाचे ते खऱ्या भावनेने करणे आवश्यक आहे. प्रेमामुळे आपल्या जीवनात आनंद येणे गरजेचे आहे. प्रेमामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहू शकतात. या व्हॅलेंटाईन्स डे रोजी मी माझ्या जवळील लोकांसोबत वेळ घालवणार. नेहेमी आम्ही भेटतो मात्र हा दिवस आमच्यासाठी विशेष आहे. मागील दुःख विसरून आम्ही एकत्र चांगला वेळ घालवणार.

 

 

– संकेत स्वेरोनिक, (समलिंगी)

sanket photo
संकेत स्वेरोनिक, (समलिंगी)

 

प्रेमाला कोणतेही नियम आणि अटी नसतात. प्रेमाला आपण कोणतीही व्याख्या देऊ शकत नाही. दोन आत्मा एकमेकांना जोडल्या जातात म्हणजेच प्रेम होयं. हा दिवस मी माझ्या घरच्यांसोबत साजरी करणार आहे. आपले कुटुंब आणि जवळी लोकांसोबत हा दिवस साजरी करायला मला आवडतो. या दिवशी आम्ही सर्वे मिळून पार्टी करतो.

 

 

 

 

श्याम कुन्नुर – (समलिंगी)

Shyam Kunnur
श्याम कुन्नुर – (समलिंगी)

न्यायालयाच्या निर्णयानंतर समाजात आम्हाला बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. मात्र तरीही काही लोकांमध्ये आमच्या प्रेमसंबधांबद्दल कटूता बघायला मिळते. प्रेम संबध ठेवणे हा गुन्हा नसला तरीही समाजाकडून आम्हाला दोषी ठरवण्यात येते. या दिवशी मी माझा पार्टनर आम्ही कँडल लाईट डिनरला जाणार आहोत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here