घरट्रेंडिंगपावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही खास टिप्स

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही खास टिप्स

Subscribe

पावसळ्यात अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

पावसाळा हा खूप लोकांचा आवडता ऋतू आहे. पावसात भिजताना प्रत्येकाला आनंद होतो. परंतु, पावसळ्यात अनेक आजारांना सामोरे जावा लागते. त्यामुळे पावसळ्यात निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. एवढेच नव्हे तर, यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये काही शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीर निरोगी राहु शकते. यासाठी तुम्हाला अधिक खर्चात पडण्याची गरज नाही.

लिंबू: लिंबाचे अनेक फायदे असतात. विशेष करुन पावसाळ्यामध्ये आहारात लिंबाचा समावेश आवर्जुन केला पाहिजे. लिंबुमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवसामध्ये लिंबू सरबताचे सेवन केले पाहिजे. लिंबूमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण असते. त्यासोबतच त्याच्या सेवन केल्याने पोटाचे कार्य सुरळीत चालते.

- Advertisement -

गवती चहा: गवती चहा सर्वसाधारण गवताप्रमाणेच दिसतो. पावसाळ्यामध्ये गवती चहाची पाने चहात टाकून तो उकळला जातो. गवती चहाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे पावसात गवती चहा उपयुक्त असते. गवती चहामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सचा पण भरपूर प्रमाणात समावेश असतो.

आलं: पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं वापरले जाते. आलं हे आरोग्यासाठी गुणकारी पदार्थ म्हणून ओळखले जाते. आल्याचा नियमित वापर केला तर, पोटातील विकार दूर होतात. तसेच पोट साफ होण्यासाठीही आलं मदत करतो. पावसाळा आला की, अनेक घरांमध्ये गृहिणी चहामध्ये आलं टाकतात. आल्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. त्यासोबतच शरीरातील वाताचा त्रासही कमी होतो. सर्दी खोकल्यासाठी सुद्धा आलं उपयुक्त ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -