घरट्रेंडिंगगोविंदाप्पा व्यंकटस्वामींना गुगल डुडलचा सलाम

गोविंदाप्पा व्यंकटस्वामींना गुगल डुडलचा सलाम

Subscribe

१ लाखाहून अधिक डोळ्यांच्या सर्जरी करुन अंधत्व येणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ७ जुलै २००६ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशाचे प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर गोविंदप्पा व्यंकटस्वामी यांना १०० वा वाढदिवसाच्या गुगलने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे गुगल-डुडल तयार करुन त्यांना या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गोविंदप्पा यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी गुगलकडून हे डुडल तयार करण्यात आले आहे. अंधत्व आलेल्या रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे काम व्यंकटेशस्वामी यांनी केले.

govindappa_venketeshswami
गोविंदप्पा व्यंकटेशस्वामी

कोण आहेत व्यंकटेशस्वामी ? 

तमिळनाडूच्या वडामल्लपुरम येथे १ ऑक्टोबर १९१८ साली डॉ. गोविंदप्पा व्यंकटस्वामी यांचा जन्म झाला. चेन्नईच्या स्टॅनली मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नेत्र विज्ञान विषयात स्पेशलायझेशन केले. त्यांनी १ लाखाहून अधिक डोळ्यांच्या सर्जरी करुन अंधत्व येणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ७ जुलै २००६ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -