Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग दुबईच्या राजपुत्राची शहामृगासोबत 'रेस', बघू कोण मारतयं बाजी

दुबईच्या राजपुत्राची शहामृगासोबत ‘रेस’, बघू कोण मारतयं बाजी

सोशल मिडिया रेसिंगचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Related Story

- Advertisement -

दुबईची श्रीमंती आणि तेथील लोकांचा थाट हा काही औरचं असतो. पैशात लोळण घेणाऱ्या दुबईमध्ये राहणाऱ्या अनेकांचे शौकच भारी असतात. यातच दुबईचे क्राऊन प्रिन्स, शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम सुद्धा मागे नाही. ते सोशल मीडियावर बरेच सक्रीय असून आपले फोटो, व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात. त्यांनी नुकताच एक नवीन हटके व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्राऊन प्रिन्स यांनी सर्वात वेगवान धावणारा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहामृगासोबत शर्यत लावली आहे. व्हिडिओमध्ये क्राऊन प्रिन्स आपल्या मित्रांसोबत सायकलिंग करताना दिसत आहेत. पण काही सेकंदांनंतर व्हिडिओमध्ये एक शहामृग रस्ताच्या बाजूला असणाऱ्या मातीतून तर क्राऊन प्रिन्स सायकलिंग करत रस्त्यावरुन एका समांतर रेषेत धावताना दिसतोय. त्याच्याकडे बघून क्राऊन प्रिन्स जोरजोरात सायकलचे पॅडल मारतात, काही सेकंदांसाठी ते शहामृगाच्या पुढेही जातात पण काही क्षणातच शहामृग त्यांना मागे टाकतो आणि रस्ता पार करुन दुसऱ्या बाजूला येतो. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fazza (@faz3)

- Advertisement -

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी क्राऊन प्रिन्स यांनी एका पक्ष्याच्या घरट्यासाठी आपली लग्जरी मर्सिडीज एसयूव्ही वापरणं बंद केलं होतं. त्या घरट्यात पक्षाने अंडे दिल्याने मकतूम यांनी घरटं न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतला आणि ती गाडी एका बाजूला उभी केली. याशिवाय गाडीच्या जवळपास कोणी जाणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली. जोपर्यंत अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडत नाहीत तोपर्यंत गाडी वापरणार नाही असं त्यांनी त्यावेळी एक व्हिडिओ जारी करुन सांगितलं होतं. पक्ष्याच्या अंड्यांसाठी घरटं न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्राऊन प्रिन्स मकतूम यांच्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला होता.

- Advertisement -