घरट्रेंडिंगअंडं आधी की कोंबडं? अखेर उत्तर सापडलंच!

अंडं आधी की कोंबडं? अखेर उत्तर सापडलंच!

Subscribe

जवळपास आपल्या सगळ्यांच्याच लहानपणापासून आपल्या सगळ्यांनाच एका प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नव्हतं. किंवा कितीही डोकं खाजवलं तरी ते मिळत नव्हतं. आणि तो प्रश्न म्हणजे अंडं आधी की कोंबडी. कारण कोंबडीशिवाय अंडं जगात येऊ शकणार नाही आणि अंड्याशिवाय कोंबडी अस्तित्वात येऊ शकणार नाही. त्यामुळे या प्रश्नाला आजपर्यंत सगळ्यांनीच बुचकळ्यात टाकलं होतं. सगळ्यांना हा प्रश्न पडत होता आणि सगळेच हा प्रश्न विचारत होते. पण उत्तर काही कुणाला मिळत नव्हतं. अखेर ब्रिटनच्या वैज्ञानिकांना यावरचं उत्तर मिळालं आहे. न्यूज २४ नं दिलेल्या वृत्तानुसार कोंबडीचं गर्भाशय आणि अंड्याचं कवच यांच्यातल्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर जगात कोंबडी आणि अंडं यात काय आधी अस्तित्वात आलं, याचा शोध लागला आहे.

आख्ख्या जगाला पडलेल्या या प्रश्नावर…

उत्तर शोधण्यासाठी ब्रिटिश वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं होतं. संशोधनातून सापडलेल्या निष्कर्षांनुसार कोंबडीच्या अंड्याच्या पांढऱ्या कवचामध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन असतं. वोक्लेडिडिन – १७ (OC-17) असं या प्रोटीनचं नाव आहे. अंड्याचं कवच तयार होण्यात या प्रोटीनची महत्त्वाची भूमिका असते. वोक्लेडिडिन-१७ हे प्रोटीन अंड्याचं कवच बनवण्यात कामी येतं, ही बाब संशोधकांना याआधीच समजली होती. मात्र, आता हे प्रोटीन कसं बनतं, याचा शोध संशोधकांना लागला आहे.

- Advertisement -

संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार…

वेक्लेडिडिन-१७ हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा संयोग झाल्यानंतर त्यातून कडक असं अंड्याचं पांढरं कवच तयार होतं. आणि वेक्लेडिडिन-१७ हे प्रोटीन फक्त कोंबडीच्या अंडाशयात तयार होतं. त्यामुळे कोंबडीचं अंडं तयार होण्यासाठी आधी कोंबडीच अस्तित्वात आली असणार, यावर ब्रिटिश वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

मात्र, यानंतर देखील प्रश्न उपस्थित होतो की…

जर अंड्याच्या आधी कोंबडी अस्तित्वात आली, तर मग अंड्याशिवाय कोंबडी अस्तित्वात कशी येऊ शकते? त्यावर उपस्थित असलेल्या काही आधीच्या संशोधनांच्या आधारे असा अंदाज लावण्यात आला आहे की अंडं देणाऱ्या इतर काही पक्ष्यांच्या विरुद्ध समागमातून पहिल्या कोंबडीचं अंडं दिलं गेलं आणि त्यातून जगातली पहिली कोंबडी जन्माला आली!

- Advertisement -

आता जर कुणी अंडं आधी की कोंबडी?..

असा प्रश्न उपस्थित झाला, तर किमान आत्तापर्यंत झालेल्या संशोधनानुसार आधी कोंबडी अस्तित्वात आली आणि त्यानंतरच कोंबडीचं अंडं तयार झालं, असं बिनधोकपणे सांगता येईल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -