Video: हत्तीच्या कळपाने काढली आपल्या पिल्लाची अंतयात्रा

Mumbai

असे नेहमी म्हटले जाते की, प्राण्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे असते. या संदर्भातील मन हेलावून टाकणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मृत व्यक्तीची अंतिम यात्रा निघताना आपण नेहमी बघतो, परंतु या व्हिडिओमध्ये हत्तीच्या कळपाने हत्तीच्या मृत पावलेल्या पिल्लूची अंतयात्रा काढल्याचे दिसत आहे. भारतीय वन सेवा विभागाचे परवीन कासवान या अधिकाऱ्याने ट्विटरवर काही दिवसांपुर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये हत्तीच्या कळपातील एका हत्तीने मृत हत्तीच्या पिल्लूला जंगलात नेण्यासाठी रस्त्यावरून घेऊन जातांना काही लोक दूर उभे राहून फक्त हे बघताना दिसत आहे.

यापैकी एक हत्ती मृत पिल्लूला उचलून रस्त्यावर घेऊन ठेवतो तर दूसऱीकडून काही हत्ती तेथे उभे राहतात. त्यानंतर एक हत्ती त्या मृत हत्तीला उतलून जंगलाच्या दिशेने सगळ्य़ा हत्तीच्या कळपाची अंतयात्रा निघते. या धक्कादायक व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here