हॅरी पॉटरमधला डॉबी जिवंत आहे? हे व्हायरल सीसीटीव्ही फूटेज पाहा!

सीसीटीव्ही फूटेजमध्ये एलियन दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल! अनेकांना तो वाटला हॅरी पॉटरमधला डॉबी!

Mumbai
Harry Potter Dobby

सोशल मीडियावर अनेकदा काहीतरी नवीन पाहायला मिळतं. युरोपातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी अनेकजणं उत्सुक झाले आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती फुटपाथवरुन दुसऱ्या बाजूस जाताना दिसत आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असे प्रश्न निर्माण होत आहेत. हा हॅरी पॉटरमधला डॉबी असू शकतो, असा काहीजणांनी दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे हॅरी पॉटर ही हॉलिवूडमधली काल्पनिक फिल्म सीरीज आहे. या सीरीजच्या सर्वच पार्टला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

Harry Potter Dobby original
हॅरी पॉटरमधलं डॉबी हे पात्र

विवियन गोमेझ असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ती एक महिला आहे. तिने घरा शेजारचे एक सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यापैकी काही जणांनी या फूटेजमधील व्यक्ती हा हॅरी पॉटरमधला डॉबी असल्याचं सांगितलं आहे. कारण, हॅरी पॉटर चित्रपटातला डॉबीदेखील असाच दिसत होता. एवढेच नव्हे तर, हा हुबेहूब डॉबीसारखा चालत देखील होता.

So I woke up Sunday morning and saw this on my camera and am trying to figure out…what the heck?? First I saw the shadow walking from my front door then I saw this thing….has anyone else seen this on their cameras?? The other two cameras didn’t pick it up for some reason.

Vivian Gomez ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜೂನ್ 6, 2019

आतापर्यंत या व्हिडिओला ४२ हजार लाईक्स आले आहेत. तसेच १ लाख ३९ हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. केवळ फेसबुकच नाही तर, ट्विटरवरही या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here