इमरान हाशमीला मिळाले जीवनातील सर्वात मोठं सुख

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीचा मुलगा अयान खान याच्यावर मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या उपचारांना यश आले आहे. अयान हाशमीला कर्करोग असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते.

Mumbai
emraan-ayaan hasmi
अभिनेता इमारान हाशमी आणि त्याचा मुलगा

बॉलिवूडचा सिरियल किसर म्हणजेच इमरान हाशमीला जीवनातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. ही बातमी इमरानने सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सला शेअर केली आहे. इमरानचा ९ वर्षीय मुलगा अखेर कर्करोग सारख्या जीवघेण्या आजारापासून बरा झाला आहे. मागील पाच वर्षांपासून इमरानच्या मुलावर उपचार सुरु होते. पाचवर्ष सतत उपचारानंतर अखेर अयान आता बरा झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. “आज पाच वर्षानंतर अयानला कर्करोग मुक्त असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. जे रुग्ण अजूनही कर्करोगाशी लढत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. इतरही रुग्ण लवकरच बरे होतील अशी मी प्रार्थना करतो.” असे इमरानने लिहिले आहे.

कर्करोग पहिल्या टप्प्यात

इमरान आणि त्याची पत्नी परवीन यांचा मुलगा अयान याचा जन्म २०१०च्या फेब्रुवारी महिन्यात झाला. २०१४ मध्ये अयानला कर्करोग असल्याचे निदान झाले. या बातमीने इमरान हाशमीला धक्का बसला. कर्करोग पहिल्या टप्प्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. २०१४ पासून अयानवर उपचार सुरु होते. इमरान याचा आगामी ‘चिट इंडिया’ चित्रपट १८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here