बॅटने सिक्स मारला, आता माझ्याकडे तलवार आहे; पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला

New Delhi
Ex Pak cricketer Javed Miandad threat to India over Kashmir
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान जो आता पाकिस्ताचा पंतप्रधान आहे. इम्रान खान रोज काश्मिरच्या मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देत आहे. आता आणखी एका माजी क्रिकेटपटूने भारताविरोधात गरळ ओकली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या फिरत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद हा मान्यातून तलवार बाहेर काढून काश्मीरी जनतेला भडकाऊ आवाहन करत आहे. या व्हिडिओत तो म्हणतो की, “काश्मीरी भावांनो काळजी करु नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. माझ्याजवळ बॅट आहे. आधी मी त्यांने सिक्सर मारायचो, आता माझ्या जवळ तलवार आहे, मी माणूसही मारू शकतो.”

काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याबद्दल निषेध आंदोलन सुरु असताना जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेट संघाची जर्सी घालून त्यात सहभागी झाला होता. यावेळी त्याने तलवार उंचावून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांमधून त्याला आपला ‘बल्ला भी तेज था, ये तलवार भी तेज है’ असे सांगताच. मियांदादने उत्तर दिले की, बॅटने जर सिक्स मारू शकतो तर तलवारने माणूस का नाही?

भारताविरोधात गरळ ओकण्याची जावेद मियांदादची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्याने काश्मीरी लोकांना हातात शस्त्र घेऊन हिंसाचार करण्याचे आवाहन केले होते. भारताने काश्मीरला विशेष सवलत देणारे कलम ३७० काढून टाकल्यानंतर मियांदादने भारतीय सरकारला डरपोक असल्याचे सांगत आम्ही आम्ही अण्वस्त्र दाखविण्यासाठी नाही तर चालविण्यासाठी बनवले असल्याची धमकी दिली होती.